Mahatma Phule Jan Arogya Yojana esakal
पश्चिम महाराष्ट्र

आयुष्यमान भारत, फुले जनआरोग्य योजनेचा सीमाभागातील 865 गावांना होणार लाभ; 1,356 आजारांवर मोफत उपचाराची सोय

सरकारने आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना नवीन नियमानुसार लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र सरकारने दावा केलेल्या ८६५ गावांतील नागरिकांना एकूण १,३५६ आजारांवरवर मोफत उपचार करून घेता येणार आहेत.

बेळगाव : महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) १ जुलै २०२४ पासून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana) आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना नव्याने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सीमाभागातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेत वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करून घेता येणार आहेत.

काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सोमवारपासून सरकारने आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) नवीन नियमानुसार लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने दावा केलेल्या ८६५ गावांतील नागरिकांना एकूण १,३५६ आजारांवरवर मोफत उपचार करून घेता येणार आहेत.

तसेच यापैकी ११९ आजारांसाठी शासकीय रुग्णालयास राखीव जागा असणार आहेत. तसेच रस्ता अपघातग्रस्त रुग्णास प्रतिवर्षी एक लाखापर्यंत मोफत उपचार, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेवर ४.५ लाखापर्यंत मदत मिळणार आहे.

तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण ६५ रुग्णालये आहेत, त्यापैकी ५६ खाजगी व नऊ शासकीय रुग्णालये आहेत. या ठिकाणी उपचाराची सोय उपलब्ध करून दिली आहे. तसेच नवीन अमलबजावणीबाबत ३० जून रोजी सर्व अंगीकृत रुग्णालयास राज्य व जिल्हास्तरावरून सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे लाभार्थी असतील

  • -महाराष्ट्रातील सर्व रेशनकार्ड धारक व आयुष्यमान भारत कार्डधारक

  • -रेशन कार्ड नसलेली अधिवासीधारक वा तहसीलदार प्रमाणपत्र

  • -शासनमान्य संस्थेतील अनाथ मुले, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, माहिती व जन संपर्क कार्यलयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेले सदस्य

  • -महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जीवित महाराष्ट्र राज्याबाहेरील रहिवासी असलेले बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे

  • -रस्ता अपघातग्रस्त महाराष्ट्रबाहेरील वा देशाबाहेरील

लागणारी कागदपत्रे

  • महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमाभागातील ८६५ गावांतील कुटुंब

  • महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील नागरिकांचे रेशनकार्ड, ओळखपत्र, आयुष्यमान कार्ड

  • ओळख पत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड ई.)

  • रेशनकार्ड नसल्यास तहसीलदारांचे प्रमाणपत्र

  • रस्ता अपघातग्रस्तासाठी ज्या जिल्ह्यामध्ये लाभ घेणार आहे, त्या जिल्ह्यातील एमएलसी, ओळखपत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT