Bedag Gram Panchayat Gram Sabha esakal
पश्चिम महाराष्ट्र

Bedag : बाबासाहेबांच्या नावाची कमान पाडणाऱ्या गावात मोठा ठराव; विरोधात निकाल जाताच ग्रामसभेतून आंबेडकरी समाज पडला बाहेर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागत कमानीबद्दल ठराव घेण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

या ग्रामसभेस गावातील २२२९ ग्रामस्थ उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

आरग : बेडग (ता. मिरज) येथील ग्रामसभेत गावामध्ये कोणत्याही महापुरुषांची कमान नको, मुलांसाठी वाचनालय करा, असा ठराव बहुमताने घेण्यात आला. बेडगेच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

पंचायत समितीच्या पत्राद्वारे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. हात उंचावून ग्रामस्थांनी कोणतीही कमान (Dr. Babasaheb Ambedkar Arch Dispute) न बांधण्याचा ठराव संमत केला. यावेळी आंबेडकरी समाजातील जनता कमान न बांधण्याचा ठराव संमत होताच ग्रामसभेतून बाहेर पडली. ग्रामसभेसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

ग्रामस्थांचे आधारकार्ड, मतदान ओळखपत्र बघितल्यानंतर ग्रामसभेसाठी प्रवेश दिला जात होता. या ग्रामसभेस गावातील २२२९ ग्रामस्थ उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच उमेश पाटील होते. प्रारंभी ग्रामविकास अधिकारी सुनील कोरे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. जिल्हा परिषदेकडून आलेल्या पत्राचे वाचन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागत कमानीबद्दल ठराव घेण्यात आला. यावेळी बहुसंख्य ग्रामस्थांनी गावामध्ये कोणत्याही महापुरुषांची कमान नको, मुलांसाठी वाचनालय करा असा ठराव बहुमताने ग्रामसभेत मंजूर केला. यावेळी इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. स्वागत कमान बांधण्याऐवजी गावांमध्ये अत्याधुनिक असे सुसज्ज वाचनालय उभे करण्याचा ठराव यावेळी बहुमताने मंजूर करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सन २००२ पासून ते मार्च २०२३ अखेर पर्यंत स्वागत कमानीबाबत घेण्यात आलेले सर्व निर्णय रद्द करण्याचा ठराव यावेळी बहुमताने मजूर करण्यात आला. यावेळी विस्तार अधिकारी सदाशिव मगदूम, तलाठी मनोहर माळी, सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके, पोलिस निरीक्षक संजीव झाडे, वाहतूक निरीक्षक प्रमुख भगवान पालवे व गणेश कोकाटे, रवींद्र भापकर तसेच सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच सर्व गटाचे नेते मंडळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखीन एक पिस्तूल जप्त

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT