Bedag Babasaheb Ambedkar Arch Dispute esakal
पश्चिम महाराष्ट्र

डॉ. आंबेडकर कमान वाद : 15 दिवसांनी निर्णय न झाल्यास आंदोलनाचा लढा तीव्र करणार; बेडगच्या सरपंचांचा स्पष्ट इशारा

सरपंच, उपसरपंच, अन्य सदस्यांवर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल, निषेधार्थ बेडग गाव बेमुदत बंद

सकाळ डिजिटल टीम

सरपंच, उपसरपंच, अन्य सदस्य यांच्यावर अॅट्रॉसिटी (Atrocity) गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ बेडग गाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता.

सांगली : जिल्हा परिषद येथे काल ग्रामस्थांचे म्हणणे व घटनाक्रम याबाबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर प्रशासनाकडून गाव सुरू करण्याच्या आवाहनाचा आदर करत तूर्तास बेमुदत बंद (Miraj Bedag) मागे घेत गाव सुरू करण्यात आले.

मात्र, पंधरा दिवसांनी सकारात्मक निर्णय न मिळाल्यास हाच लढा तीव्र करून बेडग ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येईल, असा इशारा बेडगचे सरपंच उमेश पाटील यांनी दिला. बेडग (ता. मिरज) येथील कमान प्रकरणी दुसरी बाजू ऐकून न घेता शासनाने एकतर्फी निर्णय देत सरपंच, उपसरपंच, अन्य सदस्य यांच्यावर अॅट्रॉसिटी (Atrocity) गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ बेडग गाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. या प्रकरणी नेमलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समितीसमोर आज बेडग येथील ग्रामस्थांनी सर्व घटनाक्रम व म्हणणे मांडले. योग्य तो निर्णय येत्या पंधरा दिवसांत द्यावा. सकारात्मक निर्णय मिळाला नाही तर पंधरा दिवसांनी गावच्या बैठकीत पुढील दिशा ठरवणार असल्याचे ग्रामस्थांनी या बैठकीत सांगितल्याचे सरपंच उमेश पाटील यांनी सांगितले.

प्रशासनाने ग्रामस्थांना स्वतंत्र विचार मांडण्याची मुभा दिली. सुमारे साडेतीन तास बैठक सुरू होती. बैठकीतील चर्चा सकारात्मक झाल्याने गाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पंधरा दिवसांत समितीने हा अहवाल सादर करून सकारात्मक निर्णय न दिल्यास पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.

यावेळी बेडगमधून ज्येष्ठ नेते संभाजी पाटील, परशुराम नागरगोजे, बाजार समिती संचालक बापूसाहेब बुरसे, सरपंच उमेश पाटील, उपसरपंच संभाजी नागरगोजे, संभाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य विष्णू पाटील, गौतम नागरगोजे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोजकुमार मुंडगनूर, बाळासाहेब नलवडे, श्रीकांत तळ्ळे, दिलीप बुरसे, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, पोलिस पाटील शारदा हांगे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT