नाईक-निंबाळकरांचा पराभव करून यड्रावकरांनी जिल्हा बँकेत प्रवेश केला होता.
जयसिंगपूर (कोल्हापूर) : जिल्हा बँकेसाठी (Jaysingpur District Bank Election) सेवा संस्था गटातून शिरोळ तालुक्यात (Shirol Taluka) दोन साखर कारखानदारांत (Sugar Factory Election) चुरशीची लढत निर्माण झाली आहे. एका बाजूला ११० चा तर दुसरीकडे १०२ चा दावा केला जात असल्याने मतदार १४९ की २१२ असा प्रश्न पडला आहे. विरोधकांना ‘मॅजिक फिगर’ गाठू न देण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे.
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil-Yadravkar) आणि दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील (Ganpatrao Patil) यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हक्काच्या मतदारांना सहलीवर पाठविले आहे. उर्वरित मतदारांसाठी आटापिटा केला जात आहे. अवघ्या चार दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली असताना तालुक्यात अफवांचे पीक उठले आहे. एका बाजूला १०२ मतदारांवर दावा केला जात असताना दुसरीकडून ११२ मतांवर दावा केला जात आहे. सेवा संस्था गटात १४९ मतदारांची संख्या आहे. विजयासाठी उमेदवाराला ७५ ची मॅजिक फिगर गाठणे गरजेचे आहे. फिगर गाठूनही २० ते २५ जादाचे मतदार आपल्याकडे असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सेवा संस्था गटात मतदार आहेत किती १४९ कि २१२ असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
गतवेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांचा पराभव करून यड्रावकर यांनी जिल्हा बँकेत प्रवेश केला होता. निंबाळकर यांना ४७ यड्रावकर यांना ९८ मते मिळाली होती. यावेळच्या निवडणुकीत गणपतराव पाटील स्वीकृतचा प्रस्ताव धुडकावून थेट निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली आहे. त्यांना माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती सावकार मादनाईक यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिल्याने चुरस निर्माण झाली आहे. गणपतराव पाटील यांची उद्योग समुहाव्यतिरिक्त ही दुसरी निवडणूक आहे.
दोन साखर कारखानदारांमधील ही लढत जिल्ह्यात लक्षवेधी ठरत आहे. सध्या तालुक्यात आकड्यांचा खेळ मांडला जात असताना मतदार आणि सर्वसामान्य मात्र केल्या जाणाऱ्या दाव्यांच्या आकड्यांच्या बेरजेत व्यस्त आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.