Bedag Babasaheb Ambedkar Arch Dispute esakal
पश्चिम महाराष्ट्र

डॉ. आंबेडकर कमान वाद : 'शिवरायांच्या नावाला आमचा विरोध नाही, बेडगच्या सरपंचांकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न'

बेडग ग्रामपंचायतीचे (Bedag Gram Panchayat) सरपंच स्वतःच्या बचावासाठी समाजाचा वापर करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बेडग ग्रामपंचायतीने सन २४ मार्च २०२३ रोजीच्या सभेमध्ये ऐनवेळी ठराव करत कमानीबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.

मिरज : बेडग ग्रामपंचायतीचे (Bedag Gram Panchayat) सरपंच स्वतःच्या बचावासाठी समाजाचा वापर करत आहेत. कालचा मोर्चा पालकमंत्री आणि खासदारांनी प्रायोजित केलेला होता. समाजातील तरुणांची डोकी भडकावून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप डॉ. महेश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले, ‘‘बेडग येथील आंबेडकरी समाज बांधव तब्बल २१ वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या नावची कमान उभारणीसाठी प्रयत्न करत आहे. ग्रामपंचायतीकडे सन २००२ पासून ते सन २०२३ पर्यंत तीन ठराव झाले. सदर कमानीत कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख नाही.

आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध नाहीच, मात्र या प्रकरणात समाजाची दिशाभूल करण्यात येत आहे. शिवरायांच्या नावास विरोध केल्याचा खोटा आरोप केला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांची दखल घेतली आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर ठरवून असा आरोप केला जात आहे.’’

ते म्हणाले, ‘‘बेडग ग्रामपंचायतीने सन २४ मार्च २०२३ रोजीच्या सभेमध्ये ऐनवेळी ठराव करत कमानीबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्याबाबत अधिक स्पष्टता या ठरावामध्ये दिसत नाही. कमान पाडण्यास प्रशासनाला भाग पाडले गेले. तो घटनाक्रम पाहिल्यानंतर सगळे चित्र स्पष्ट होते.

त्यासाठी पालकमंत्री सुरेश खाडे आणि खासदार संजय पाटील यांचा दबाव होता. त्यांच्या सांगण्याने पोलिस बंदोबस्त तातडीने दिला गेला.’’ सचिन कांबळे, रणजीत कांबळे, सागर आवळे, अमर कांबळे, जयंत मगरे, अतुल खाडे, अरुण कांबळे, स्वप्निल खांडेकर, स्वप्निल बनसोडे, सागर आठवले, अरविंद कुरणे, उमेश धेंडे, तुषार खांडेकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT