Bees attack on gathering for faith 
पश्चिम महाराष्ट्र

श्राद्धासाठी जमलेल्यांवर मधमाश्‍यांचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी ः तालुक्‍यातील कारेगाव येथे काल (गुरुवारी) वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांवर आग्यामोहोळाच्या मधमाश्‍यांनी हल्ला केला. त्यात पंचवीस ते तीस जण जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

कारेगाव येथे मोहटादेवी रस्त्यावर मूकबधिर विद्यालयासमोर वडाच्या झाडाखाली वर्षश्राद्धाचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमातील पूजेत लावण्यात आलेल्या उदबत्तीच्या धुराने झाडाच्या फांदीला असलेले आग्यामोहोळ खवळले. उपस्थितांवर मधमाश्‍यांनी हल्ला चढवला. अचानकच झालेल्या या हल्ल्याने एकच धावपळ उडाली. यातील अनेकांनी जवळच असलेल्या मूकबधिर विद्यालयाचा आधार घेतल्याने ते बचावले. 

कार्यक्रमाला जवळपास अडीचशे ते तीनशे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांपैकी पंचवीस ते तीस जणांना जास्त प्रमाणात मधमाश्‍या चावल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील बहुतांश व्यक्तींना डॉक्‍टरांनी प्रथम उपचार करून घरी सोडून दिले. मात्र, नाथनगरमधील अमोल खेडकर यांना जास्त मधमाश्‍या चावल्याने त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती रघुनाथ घुगे यांनी दिली. 

अमोल कोतकरला जामीन मंजूर 

नगर ः अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी अमोल कोतकर याला आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. ही सुनावणी न्यायमूर्ती रणजित मोरे व सुरेंद्र तावडे यांच्यासमोर झाली. 

येथील अशोक लांडे खून खटल्यामध्ये भानुदास कोतकरसह त्यांच्या तीन मुलांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. काही दिवसांपूर्वी भानुदास कोतकर यांना काही अटी व शर्तींवर न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. या प्रकरणातील आरोपी अमोल कोतकर याने जामीन मिळण्यासाठी मुंबई खंडपीठामध्ये अर्ज दाखल केला होता. तो मंजूर करण्यात आला आहे. मात्र, अमोलला जिल्हाबंदी कायम ठेवण्यात आली आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT