Ganpati sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : मंदिर किंवा कार्यालय नसलेल्या मंडळांना लहान मंडप घालण्याची परवानगी द्या

मिलिंद देसाई

बेळगाव : शहरातील अनेक ठिकाणी मंदिर किंवा कार्यालय उपलब्ध नाही. त्यामुळे शहरातील 75 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करताना अडचण निर्माण होणार आहे. त्याची दखल घेऊन प्रशासनाने 75 मंडळांना दहा बाय दहा आकाराचा मंडप उभारण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे करण्यात आली असून याबाबत सोमवारी (ता. 30) रोजी पोलीस आयुक्त डॉ. के त्यागराजन निवेदन देण्यात आले आहे.

गणेशोत्सव अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मंडळांकडून गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. मात्रप्रशासनाने घालून दिलेल्या अनेक निर्बंधांमुळे अनेक मंडळे संभ्रमावस्थेत असल्याने मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले यावेळी

अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील यांनी शहरातील 76 हून अधिक मंडळांना त्यांच्या गल्लीमध्ये मंदिर किंवा कार्यालय उपलब्ध नसल्यामुळे श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करताना अडचण येणार आहे. प्रशासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून लहान आकारातील मंडप घालण्याची परवानगी द्यावी. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई लहान आकारातील मंडप घालण्याची परवानगी देण्याबाबत

विचार विनिमय सुरू असल्याची माहिती दिली होती मात्र अद्याप याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे मंडळ यांची गोची झाली असून प्रशासनानेही लवकर निर्णय घेऊन दहा बाय दहा आकाराचा मंडप घालण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे मंडळांना गणेशोत्सवाची तयारी करण्यास वेळ मिळेलअसे मत मांडले.

यावेळी पोलीस आयुक्त त्यागराजन यांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्व मंडळांना पालन करावे लागणार आहे. मात्र याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती कळवली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, सचिव शिवराज पाटील, विकास कलघटगी, मदन बामने, सतीश गौरगोंडा आदी उपस्थित होते.

"कोरोनाचे नियम पाळून लहान आकाराचा मंडप घालण्याची परवानगी दिल्यानंतर सर्व मंडळे कोरोना नियमांचे पालन करतील. तसेच नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेतील असेही मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे प्रशासनाला सांगण्यात आले आहे तसेच प्रशासनाने एक-दोन दिवसात निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे."

- रणजित चव्हाण पाटील, अध्यक्ष मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN 1st Test : R Ashwin चा वर्ल्ड रेकॉर्ड! एकाही ऑल राऊंडरला हे जमलं नाही, जे 'अण्णा'ने केलं; ४ भारी विक्रम

The Sabarmati Report : 'द साबरमती रिपोर्ट' रिलीजची तारीख ठरली या दिवशी होणार चित्रपट रिलीज !

Chandrayaan 4 Budget : अवकाश मोहिमांना मोदी सरकारने दिले बळ; चांद्रयान-४ अन् ‘गगनयान’सह शुक्राच्या अभ्यासासाठी किती कोटींचं बजेट मंजूर?

Congress : वादग्रस्त वक्तव्य भोवलं! 'या' बड्या नेत्याची काँग्रेसमधून हकालपट्टी, रेड्डींवर अध्यक्षपदाची जबाबदारी

Latest Marathi News Live Updates : नंदूरबार येथे माळीवाडा परिसरात दोन गटात तुफान दगडफेक

SCROLL FOR NEXT