BJP BJP
पश्चिम महाराष्ट्र

दोन मंत्री, तेरा आमदार व चार खासदार असूनही भाजपचा बेळगावात पराभव

विधानपरीषद निवडणूकीत काँग्रेस व अपक्ष उमेदवारांची बाजी

मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी बेळगावात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या तमाम नेत्यांना विधानपरीषद निवडणूक निकालाने धक्का बसला आहे. बेळगाव जिल्ह्यात भाजपचे १३ विधानसभा सदस्य, तीन लोकसभा सदस्य, एक राज्यसभा सदस्य, दोन मंत्री, तीन विधानपरीषद सदस्य असणाऱ्या भाजपचा विधानपरीषद निवडणूकीत दारूण पराभव झाला आहे. नियोजनबद्ध प्रचार व प्रत्येक मतदारासोबतचा व्यक्तीगत संपर्क या बळावर कॉंग्रेसने या निवडणूकीत बाजी मारली.

अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्या विजयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ हे विद्यमान विधानपरीषद सदस्य होते. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई स्वतः बेळगावला आले होते. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील, मंत्री ईश्‍वराप्पा यांच्यासह राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी कवटगीमठ यांच्यासाठी जिल्ह्यात प्रचार केला होता.

तरीही कवटगीमठ हे तिसऱ्या स्थानावर पोहोचले. कोणत्याही स्थितीत कवटगीमठ विजयी झालेच पाहिजेत असा दम बेळगाव दौऱ्यात मुख्यमंत्री बोम्मई यानी पक्षाच्या स्थानिक आमदारांना व नेत्याना दिला होता, पण त्याचा फायदा झाला नाही. कवटगीमठ हे पहिल्या फेरीतच विजयी होतील असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला होता, पण तो फोल ठरला.

* विधानसभेच्या पोटनिवडणूकीत हनगल मतदारसंघातील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला होता. विधानपरीषद निवडणूकीत बेळगावात हनगलची पुनरावृत्ती होईल असा दावा बेळगाव ग्रामीणच्या आमदार व कॉंग्रेसचे विजयी उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांच्या भगिनी लक्ष्मी हेब्बाळकर यानी केला होता. तो दावा खरा ठरल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. चन्नराज यांच्या विजयात माजी मंत्री व यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांची भूमिका महत्वाची आहे. त्यांचे बंधू लखन हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असतानाही त्यानी चन्नराज यांच्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र मोर्चेबांधणी केली.

सतीश यानी नगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून दोनवेळा विजय मिळविला होता. त्यामुळे या निवडणूकीचा चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी होता. त्याचा फायदा या निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाला झाला. या निवडणूकीची तयारी कॉंग्रेस पक्षाने दोन महिने आधीच केली होती. शिवाय उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून प्रचारातही कॉंग्रेस पक्षाने आघाडी घेतली होती. भाजपने अखेरच्या टप्प्यात प्रचाराचा जोर वाढविला, पण त्याचा फायदा झाला नाही. लोकसभा पोटनिवडणूकीत कॉंग्रेसकडून सतीश जारकीहोळी उभे असतानाही त्यांचे बंधू आमदार रमेश जारकीहोळी व लखन यानी भाजपला मदत केली होती. त्यामुळे भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांना गोकाक व आरभावी मतदारसंघात मताधिक्य मिळाले होते. परीणामी अवघ्या साडेतीन हजार मतांनी सतीश यांचा पराभव झाला होता.

तो पराभव सतीश यांच्या जिव्हारी लागला होता. त्या पराभवाचा वचपा त्यानी विधानपरीषद निवडणूकीत काढला. आमदार, खासदार व मंत्र्यांची फौज, राज्यात तसेच केंद्रात सत्ता असतानाही बेळगाव जिल्ह्यात भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून कॉंग्रेस उमेदवार चन्नराज पहिल्याच फेरीत विजयी झाले हे विशेष. २०२३ राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणूकीची रंगीत तालीम म्हणून विधानपरीषद निवडणूकीकडे पाहिले जात होते. ही रंगीत तालिम जिल्ह्यात कॉंग्रेसने जिंकली हे खरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT