अंगणवाडी  sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : अंगणवाडी भरतीसाठी कन्नड सक्ती; मराठी भाषिक महिलांना डावलण्याचा प्रयत्न

खानापूर तालुक्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत

मिलिंद देसाई

बेळगाव : पुन्हा एकदा कानडी वरवंटा फिरविण्याचा डाव सूरू झाला असुन लवकरच भरती केल्या जाणाऱ्या अंगणवाडी सहायिकांना नियुक्तीनंतर कन्नड परीक्षा पास व्हावी लागणार आहे. त्यामुळे अंगणवाडीत भरतीसाठी कन्नडची lसक्ती करण्यात येत असल्याने मराठी भाषिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच याबाबत आवाज उठवावा आणि कन्नडची सक्ती दूर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

1975 पासून देशभरात अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र यापूर्वी कधीही कर्मचारी भरती करते वेळी भाषेची सक्ती केली जात नव्हती. त्यामुळे सर्व भाषिक महिलांना अंगणवाडीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. सध्या देखील जो भाग मराठी भाषिक आहे त्या ठिकाणी मराठी महिला तर ज्या ठिकाणी कन्नड व इतर भाषिक लोक राहतात त्या त्या ठिकाणी त्या भाषेच्या महिला कर्मचारी म्हणून अंगणवाडीमध्ये कार्यरत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून महीला व बाल कल्याण खात्याकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी कन्नड भाषेची सक्ती असल्याची माहिती दिली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बेळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अंगणवाडी सहायिकांच्या जागा भरती करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आली आहे. यासाठी तब्बल ८०० हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. मात्र भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कन्नड विषयाची परीक्षा द्यावी लागणार आहे.

खानापूर तालुक्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्या जागा भरती करण्याची मागणी केल्यानंतर ज्यांची प्रथम भाषा कन्नड आहे. अशा युवती किंवा महिलांना कर्मच्यारी पदासाठी अर्ज करता येईल असे सांगितले जात असून त्यामुळे जाणीवपूर्वक मराठी भाषिक महिलांना डावलण्याचा प्रयत्न महिला व बालकल्याण खात्याकडून केला जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. याची दखल घेत महाराष्ट्र एकीकरण समिती व इतर संघटनांनी याबाबत आवाज उठवावा आणि कन्नडची सक्ती दूर करून घ्यावी अअशी मागणी होऊ लागली आहे.

खानापूर व बेळगाव तालुक्यातील अनेक गावे मराठीबहुल आहेत. त्यामुळे विविध अंगणवाड्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी मराठी भाषिक महिलांकडून अधिक प्रमाणात अर्ज दाखल होतात. याचा विचार करून कर्मचारी भरतीसाठी कन्नड ची शक्ती करू नये अशा प्रतिक्रिया ग्रामीण भागातून उमटू लागल्या आहेत.

अंगणवाडी कर्मचारी भरती करताना कन्नडची सक्ती करणे अतिशय चुकीचे असून याबाबत राज्य स्तरावर निषेध नोंदविण्यात आला आहे. तसेच याबाबत सरकारकडे देखील मागणी करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांवर मुलांमध्ये पौष्टिकता वाढवणे गर्भवती महिलांची काळजी घेण्याची जबाबदारी असते त्यामुळे जागा भरतीसाठी भाषेची सक्ती करणे अयोग्य आहे याबाबत सातत्याने आवाज उठवला जात असून सरकारचे धोरण पूर्णपणे चुकीचे आहे.

ऍड नागेश सातेरी, अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT