Summer Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum Temperature : उष्मा वाढला, सांभाळा स्वतःला

सतीश जाधव

बेळगाव शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा ३९.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दरवर्षी मेमध्ये सर्वाधिक तापमान असते.

बेळगाव शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा ३९.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दरवर्षी मेमध्ये सर्वाधिक तापमान असते. यंदाही सध्याच्या तापमानवाढीचा विचार करता तापमानात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असल्याने अनेक जण प्रचारात गुंतले आहेत. त्यांना उष्णतेतच बाहेर पडावे लागते. यंदा उष्णता अधिक असल्याने उष्माघाताची शक्यता वर्तविली जाते. उष्माघातात नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उष्णतेची लाट पाहता आवश्यक नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे. उष्माघात होऊ नये, यासाठी काय खबरदारी घ्यावी, यासंबंधीची माहिती तज्ज्ञांच्या मदतीने या ठिकाणी मांडली आहे.

उष्माघात म्हणजे काय?

उष्माघात म्हणजेच सूर्यघात. ज्यात प्रखर तापमानाला सामोरे गेल्याने शरीरातील उष्णता-संतुलन ढासळते. वातावरणातील जास्त तापमान शरीर सहन करू शकले नाही, तर असा उष्माघात होतो. जास्त तापमानामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होण्याची शक्यता असते. उष्माघात अगदी अचानक, अनपेक्षित येत नाही. नीट लक्ष दिल्यास त्याची आधी चाहूल लागते. उन्हाळ्यात तहान, थकवा घालवण्यासाठी साखर-पाणी घेतले पाहिजे. सावलीत, गार हवेत विश्रांती घेतली पाहिजे.

यांनी घ्यावी अधिक काळजी

उष्माघात हा उष्णतेने होणारा सर्वात घातक प्रकार आहे. उष्माघात हा पाच वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, लट्ठ व्यक्ती, दारू घेतलेले, काही विशिष्ट औषधे घेणारे यांना उष्माघाताचा धोका जास्त असतो. रस्त्यावर, शेतात काम करणारे श्रमिक, रस्त्यावर विक्रीसाठी फिरणारे फेरीवाले, उन्हात वाहने चालवणारे रिक्षाचालक, गरम वातावरणात काम करावे लागणारे कामगार यांनीही विशेष काळजी घ्यावी.

उष्माघाताची लक्षणे

  • चक्कर येणे, उलट्या होणे, मळमळ होणे

  • शरीराचे तापमान जास्त वाढणे

  • पोटात कळ येणे

  • शरीरातील पाणी कमी होणे

  • हृदयाची धडधड, ठोके वाढणे

  • भरभर आणि दीर्घ श्वास

  • चिडचिड, बेशुद्ध होणे

  • डोकेदुखी

काही महत्त्वाच्या सूचना

  • उन्हात, गरम हवेत सतत काम करणे टाळावे. मधूनमधून सावलीत थांबावे. शक्यतो सकाळी लवकर कामाला सुरुवात करून दुपारी विश्रांती घ्यावी.

  • तहान शिल्लक ठेवू नये. त्यासाठी दर तासाला एक ग्लासएवढे पाणी प्यावे. (लघवी गडद पिवळी होणार नाही एवढे.)

  • हवेचे तापमान ४४ अंशांपेक्षा पेक्षा जास्त असेल तर शाळा, महाविद्यालये, कचेऱ्या, दुकाने इ. सकाळी ११ ते दुपारी ४ बंद ठेवाव्यात.

  • शरीर पूर्ण झाकले जाईल; पण हवा खेळती राहील असे पांढरे किंवा फिकट रंगाचे, सुती कपडे घालावे.

  • घरातून बाहेर पडताना, विशेषत: प्रवासात पुरेसे पिण्याचे पाणी जवळ बाळगावे.

  • उष्माघाताची शंका आल्यास लगेच सावलीत नेऊन, अंगावर ओली चादर लपेटून वारा घालत दवाखान्यात न्यावे.

बेळगावचे तापमान यंदा अधिक आहे. उन्हाळ्यात उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे या काळात अधिक काळजी घ्यावी लागते. चक्कर येणे, उलट्या होणे, मळमळ होणे, शरीराचे तापमान जास्त वाढणे आदी लक्षणे दिसून येतात. यामुळे काळजी घ्यावी.

- स्वप्ना महाजन, अध्यक्षा, आयएमए

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT