राणी चन्नमा विद्यापीठाअंतर्गत (आरसीयू) येणाऱ्या पदवी, पदव्यूत्तर महाविद्यालायांच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रासाठी (डीगरी सर्टिफीकेट) अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाने एक पत्रक काढून केले आहे.
बेळगाव - राणी चन्नमा विद्यापीठाअंतर्गत (Rani Chanamma University) (आरसीयू) येणाऱ्या पदवी, पदव्यूत्तर महाविद्यालायांच्या (College) विद्यार्थ्यांना (Student) पदवी प्रमाणपत्रासाठी (डीगरी सर्टिफीकेट) (Degree Certificate) अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाने एक पत्रक काढून केले आहे. मात्र, या प्रमाणपत्रासाठी देशातील विद्यार्थ्यांना १२०० रुपये तर परदेशातील विद्यार्थ्यांना १२ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. विद्यापीठाकडून इतके शुल्क आकारणी केली जात असल्याने विद्यार्थ्यांतून नाराजी दिसून येत आहे.
विद्यापीठात प्रवेश घेतल्यापासून शिक्षण पूर्ण होऊन बाहेर पडेपर्यंत विद्यापीठाकडून या ना त्या कारनाने मोठ्या प्रमाणात शुल्क आकारणी केली जाते. यामुळे विद्यार्थ्यांतून नेहमीच नाराजी दिसून येते. त्यातच आता पदवी प्रमाणपत्रासाठी १२०० रुपये आकारणी केली जात आहे. पदवी, पदव्यूत्तर, डिप्लोमा व सर्टिफीकेट कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी स्टुडंट पोर्टलच्या माध्यमातून या प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी ५ एप्रिलपासून अर्ज भरणा सुरु करण्यात आला आहे. विना दंड २० एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच रोज १०० रुपये दंडासहीत २१ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत अर्ज करता येईल. विद्यापीठाचा नुकताच ९ वा पदवीदान समारंभ राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्या उपस्थितीत सुवर्ण विधानसौध येथे पार पडला. मात्र, २०२०-२१ या वर्षातील १० व्या पदवीदान समारंभासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
स्टडंट पोर्टलवर असा करा अर्ज
स्टुडंट पोर्टलवर मोबाईल क्रमांक व पासवर्डच्या माध्यमातून लॉगीन करा. त्यानंतर कॉनवकेशन मध्ये जाऊन अर्ज भरा. यामध्ये राष्ट्रीयत्व, जन्म तारीख, पत्ता, राज्य, देश, पीनकोड व रक्कम अजा केल्यानंतर सबमीट करा. तुम्हाला विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्र घरपोच येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.