police sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : गणेशोत्सव काळात सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळानी डॉल्बीला फाटा

आदेशाचे उल्लंघन केल्यास सर्वप्रथम डॉल्बी मालकावर त्यानंतर मंडळावर गुन्हे

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : गणेशोत्सव काळात सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळानी डॉल्बीला फाटा देत पारंपारिक वाद्ये वाजविण्यावर भर द्यावी. कोणीही डॉल्बीचा वापर करू नये, अन्यथा संबंधित डॉल्बी मालकासह मंडळावर गुन्हे दाखल केले जातील. केवळ दोन साऊंड बॉक्स लावण्यास मुभा असेल अशी सुचना पोलीस खात्याच्यावतीने करण्यात आली.

शुक्रवार (ता.२६) मार्केटचे सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये आज दोन्ही गणेशोत्सव महामंडळे आणि डॉल्बी असोसिएशन पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, मार्केटचे सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण बरमनी, बेळगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलीस आयुक्त एस. व्ही. गिरीश, गुन्हे तपास विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टीमनी माळमारुतीचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाने डॉल्बीचा वापर करण्यावर बंदी घातले आहेत. त्यामुळे सर्वांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. पारंपरिक वाद्य वाजविण्यात यावीत. त्याला कोणत्याही प्रकारची हरकत राहणार नाही. केवळ दोन साऊंड बॉक्स लावण्यात परवानगी असेल. त्यामुळे सर्वांनी सहकार्याची भूमिका दर्शवत डॉल्बीला फाटा द्यावा. श्री गणेश विसर्जन मिरवणूक लवकर सुरू करून लवकर संपवावी अनंत चतुर्दशी संपवून दुसऱ्या दिवशी विसर्जन करणे चुकीचे आहे. त्यामुळे सर्वांनी आपली संस्कृती जपत उत्सव साजरा केला पाहिजे. डॉल्बीमुळे अबालवृध्दाना नाहक त्रास सहन करावा लागतो.

त्यामुळे सर्वांनी या आदेशाचे पालन करत पारंपारिक वाद्ये वाजवण्याकडे भर द्यावा. असे पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले. आदेशाचे उल्लंघन केल्यास सर्वप्रथम डॉल्बी मालकावर त्यानंतर मंडळावर गुन्हे दाखल केले जातील. असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. बैठकीला सुनील जाधव, विकास कलघटगी, नेताजी जाधव, हेमंत हावळ, प्रवीण पाटील, रमेश कळसन्नावर, बाबुलाल राजपुरोहित, महादेव पाटील, विजय जाधव, नितीन जाधव, गिरीश धोंगडी, रमेश सोंटक्की यांच्यासह इतर पदाधिकारी व डॉल्बी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT