Belgaum Municipal Corporation sakal
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum Municipal Corporation : विरोधी गटनेत्याची निवड होणार कधी?

महापौर निवडणूक होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला, तरी विरोधी गटनेत्याची निवड झालेली नाही. महापालिकेची पहिली बैठक सोमवारी (ता. ६) विरोधी गटनेत्याशिवाय पार पडली.

सकाळ वृत्तसेवा

महापौर निवडणूक होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला, तरी विरोधी गटनेत्याची निवड झालेली नाही. महापालिकेची पहिली बैठक सोमवारी (ता. ६) विरोधी गटनेत्याशिवाय पार पडली.

बेळगाव - महापौर निवडणूक होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला, तरी विरोधी गटनेत्याची निवड झालेली नाही. महापालिकेची पहिली बैठक सोमवारी (ता. ६) विरोधी गटनेत्याशिवाय पार पडली. वस्तुतः जानेवारीत प्रादेशिक आयुक्तांनी महापौर निवडणूक जाहीर केल्यानंतर सर्वात आधी विरोधी गटनेत्याचीच चर्चा सुरु झाली होती.

विरोधी गटातील काही नगरसेवकांनी आपल्याला हे पद मिळावे यासाठी मोर्चेबांधणी केली होती. काही इच्छुकांनी विरोधी गटातील नगरसेवकांची यासाठी मोट बांधण्याचा प्रयत्नही केला होता, पण हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यामुळे विरोधी गटनेता निवड झालेली नाही. महापौर निवडणुकीनंतर मात्र हा विषय मागे पडला. या पदासाठी इच्छूक असलेल्यांनी माघार घेतली. पहिल्या बैठकीआधी विरोधी नगरसेवकांनी एकत्र येवून गटनेता निवडणे आवश्‍यक होते, पण तसे झालेले नाही. विरोधी गट एकसंघ नसल्यानेच अशी स्थिती उद्भवली आहे. विरोधी गटनेता निवड महापौरांकडून केली जाते. विरोधी गटातील सर्वाधिक नगरसेवक ज्यांना लेखी पाठिंबा देतात, त्यांना विरोधी गटनेता म्हणून निवडले जाते. मात्र, विरोधी गटाकडून अद्याप नेतेपदासाठी महापौरांकडे प्रस्तावच देण्यात आलेला नाही.

महापालिकेतील ५८ पैकी ३५ नगरसेवक सत्ताधारी भाजपचे आहेत. शिवाय महापौर निवडणुकीत तीन अपक्ष नगरसेवकांनी भाजपला मतदान केल्यामुळे भाजपचे संख्याबळ ३८ पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीदिवशीच राजशेखर डोणी यांची सत्ताधारी गटनेता म्हणून निवड करण्यात आली. महापौर निवडणुकीत विरोधी गटात एकमत नसल्याचे पहावयास मिळाले.

काँग्रेस तसेच काही अपक्ष नगरसेवकांनी महापौर निवडणुकीवर बहिष्कार टाकला. काहींनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला. विरोधी गटात काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समिती, एमआयएम व अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे त्या सर्वांनी एकत्र येत आपला नेता निवडणे आवश्‍यक आहे. महापालिकेच्या सोमवारच्या बैठकीचे नियोजन घाईगडबडीत करण्यात आले होते. ऐनवेळी बैठकीची नोटीस नगरसेवकांना देण्यात आली. त्यामुळे विरोधी नगरसेवकांना गटनेता निवडीबाबत चर्चा करण्यास संधी मिळाली नाही. आता अंदाजपत्रक बैठकीआधी तरी विरोधी गटनेता निवडला जाणार का? हे पाहावे लागणार आहे.

विरोधी गट पडला मागे

कर्नाटक महापालिका कायद्यात सत्ताधारी व विरोधी गटनेता पदाची तरतूद नाही, पण बेळगावात महापालिका स्थापन झाल्यापासून सत्ताधारी व विरोधी गटनेता निवडला जातो. शिवाय दोन्ही गटनेत्यांसाठी महापालिकेत स्वतंत्र कक्षही दिला जातो. गटनेत्यांमुळे बैठकीच्या कामकाजाला शिस्त लागते, पण नेता निवडण्यात यावेळी विरोधी गट मागे पडल्याचे चित्र महापालिकेत पहावयास मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT