Marathi Language Sakal
पश्चिम महाराष्ट्र

सरकारच्या विरोधात मराठी भाषिकांचा 25 रोजी भव्य मोर्चा

प्रशासनातर्फे मराठी भाषिकांविरोधात कट कारस्थान; महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार

मिलिंद देसाई

बेळगाव : प्रशासनातर्फे मराठी भाषिकांविरोधात कट कारस्थान केले जात आहे. याच्या विरोधात 25 ऑक्टोंबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मराठी भाषिकांची ताकद दाखविण्यात येणार आहे त्यामुळे मोर्चाबाबत ठिकाणी जनजागृती करावी असे आवाहन मध्यवर्ती समितीतर्फे करण्यात आले आहे.

मध्यवर्ती म ए समितीच्या पदाधिकार्‍यांची मंगळवारी मराठा मंदिर येथे बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष दीपक दळवी होते. यावेळी दळवी यांनी विविध प्रकारे कर्नाटक सरकारची दडपशाही सुरू असून नियमाप्रमाणे तिन्ही भाषेतील फलक लावणे गरजेचे असताना फक्त इंग्रजी व कन्नड भाषेत फरक लावले जात आहेत. याबाबत शहरवाशीयांमध्ये नाराजी आहे. भाषिक अल्पसंख्यांक कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहेत त्यामुळे यापुढे आपल्याला अधिक सहजपणे आपल्या तक्रारी मांडाव्या लागणार आहेत. महापालिका निवडणुकीत पराभव झाल्याचे शल्य सर्वांना आहे. मात्र पण सातत्याने लढणारे कार्यकर्ते आहोत. समितीला प्रवीण यासाठी सरकारी यंत्रणा राबविण्यात आली. मात्र यापुढेही आपण आपल्या ध्येयासाठी लढले पाहिजे. या ना त्या कारणाने मराठी भाषिकांचे हक्क डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपली ताकत दाखवून देण्यासाठी आणि तिन्ही भाषेतून फलक लावा, भाषिक जन गणती पुन्हा एकदा करा, महापालिकेसमोर लावण्यात आलेला अनधिकृत त्वरित हटवा आदी मागण्या मोर्चाच्या माध्यमातून मांडल्या जातील. मोर्चाच्या माध्यमातून ताकत दाखविने गरजेचे आहे. त्यामुळे गल्लोगल्ली आणि गावागावात बैठका घ्याव्यात असे मत व्यक्त केले.

माजी आमदार मनोहर किणेकर यांनी बेळगाव शहर आणि तालुक्यात मराठी भाषकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून देखील मराठी भाषीक कमी संख्येने आहेत असे असे दाखवून मराठी भाषिकांना सुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे या सर्वांना रस्त्यावर उतरून उत्तर देणे गरजेचे आहे. रस्त्यावरची लढाई लढणे ही काळाची गरज असून येणाऱ्या काळात संघटन बळकटीवर भर द्यावा लागेल असे मत व्यक्त केले. माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी प्रास्ताविक केले.

बैठकीला खजिनदार प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण पाटील, खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष देवाप्पा गुरव, ॲड राजाभाऊ पाटील, विकास कलघटगी, निपाणी विभाग समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर, बी ओ येतोजी, गोपाळ पाटील, गोपाळ देसाई, संभाजी देसाई, रणजित पाटील, बी एस पाटील, सूर्याजी पाटील, राजू मरवे यांच्यासह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT