belgoan railway  sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : आरपीएफकडून ६२१ मुलांची सुटका

वर्षभराची आकडेवारी ; नैर्ऋत्य रेल्वेकडून मानवी तस्करी रोखण्यास पथके

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : रेल्वेतून होणारी मानवी तस्करी रोखण्यासाठी नैर्ऋत्य रेल्वेच्या रेल्वे प्रोटेक्‍शन फोर्सने (आरपीएफ) ‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ सुरु केले आहे. या उपक्रमांतर्गत मानवी तस्करीच्या प्रकरणांमध्ये तात्काळ प्रतिसाद दिला जातो. यामुळेच गत आर्थिक वर्षात ५४६ मुले व ७५ मुलींची तस्करी रोखण्यात आरपीएफला यश आले आहे.

नैर्ऋत्य रेल्वेंच्या हुबळी, बंगळूर व म्हैसूर विभागात हा उपक्रम राबविला जात आहे. आरपीएफच्या तस्करीविरोधी पथकांकडून गुन्हेगारांच्या तावडीतून मुलांची सुटका करण्यासाठी काही गटांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या मुलांच्या सुरक्षेसाठी महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाशी सल्लामसलत करुन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

प्रत्यक्ष मोहिमेवेळी दिल्ली, गुजरात, राजस्थान, पंजाब, पश्चिम बंगाल यासारख्या विविध राज्यांतून नेल्या जाणाऱ्या मुलांच्या अपहरणाची अनेक सक्रिय प्रकरणे उघडकीस आली आहेत. या कारवाईत अवयव तस्करीच्या गुन्ह्यांचाही छडा लावण्यात आला. काळ्या बाजारात अवैधरित्या अवयव विकण्यासाठी अपहरण केलेल्या मुलांचीही सुटका करण्यात आली आहे. देशाच्या विविध भागांतून आणलेल्या बालकामगारांच्या अनेक प्रकरणांना छडा लावून मुलांची सुटका करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

नैर्ऋत्य रेल्वेच्या अनेक लहानमोठ्या रेल्वे स्टेशनवरुन गेल्या काही वर्षात अनेक मुलांची सुटका केली आहे. बंगळूरमधील मॅजेस्टिक, यशवंतपूर आणि कॅण्टोन्मेंट स्टेशनवरुन सर्वाधिक मुलांची तस्करी रोखण्यात आली आहे. रेल्वेने २०१७ मध्ये प्रामुख्याने बालकामगार म्हणून काम करण्यासाठी शहरात बेकायदेशीरपणे आणलेल्या मुलांना रोखण्यासाठी हे ऑपरेशन सुरु केले. त्यात आतापर्यंत चांगले यश आले आहे.

हुबळी विभागातील आकडेवारी

नैर्ऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागात जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत ४२ मुले व ३७ मुली असे एकूण ७९ जणांची तस्करी रोखण्यात आली. तसेच जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीत १० मुले व ६ मुली असे एकूण १६ जणांची सुटका करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

Sangli Election Results : 83 जणांचे 'डिपॉझिट' जप्त, मातब्बर नेत्‍यांचा समावेश; सोळा लढले, बाकीचे फक्त नडले

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

Latest Marathi News Updates : नागपूरमधील CM एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानासमोरील नावाची पाटी काढली

SCROLL FOR NEXT