Bhaskar Jadhav Nilesh Rane 
पश्चिम महाराष्ट्र

Bhaskar Jadhav: निलेश राणेंचं भाषण लोकांना हजारवेळा दाखवा; भास्कर जाधव असं का म्हणाले?

कार्तिक पुजारी

मुंबई- चिपळूणमध्ये राणे आणि ठाकरे गटामध्ये राडा झाला होता. याप्रकरणी तीनशे ते चारशे लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. निलेश राणेंनी शुक्रवारी आपल्या भाषणातून भास्कर जाधव यांना शिविगाळ केली होती. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. निलेश राणे यांचे कालचे भाषण लोकांना हजारवेळा दाखवा. लोकांना भाजपची संस्कृती कळू द्या, असं ते म्हणाले. (Bhaskar Jadhav said Show Nilesh Rane speech to people a thousand times)

संपूर्ण फूटेज चेक करावं. आम्ही असं काहीतरी घडेल याची कल्पना पोलिसांना दिली होती. त्यांनी वाट्टेल तेथे पोस्टर, झेंडे लावले. आम्ही एकाही बॅनर-पोस्टरला हात लावले नाहीत. त्यांना येण्यासाठी हाच मार्ग होता का? त्यांना दोन मार्ग होते. तो सगळा सोडून ते ६० किलोमीटर वळून चिपळूण शहरात आले, असा आरोप जाधव यांनी केलाय.

माझ्या ऑफिसच्या बाजूच्या रस्त्याने ते गेले. त्याचवेळी त्यांनी माझ्या ऑफिसमध्ये टिझर प्रसिद्ध केले होते. दंगल होण्यासाठी वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. त्यामुळे लोकं जमले होते. त्यावेळी कोणीही त्यांची छेड काढली नाही. आम्हाला विरोध करायचा असता तर तेव्हाच केला असता, असं ते म्हणाले.

आज पोलीस ३००-४०० लोकांवर गुन्हा दाखल करताहेत. राणे रेस्ट हाऊसला गेले. रेस्टहाऊसमध्ये ५० मीटरवर त्यांचं स्वागत क्रेनवर हार ठेवून करण्यात आलं. आमची काही हरकत नाही. हा रस्ता माझ्या घरासमोरुन जातो त्यामुळे मुद्दाम हा रस्ता निवडला. मला अडचण नाही. पण, रितसर सभा घ्यावी. पण, त्यांना भास्कर जाधवांच्या कार्यालयासोरच राडा करायचा होता, असं ते म्हणाले.

असला राडा मी चालू देणार नाही असं पोलिसांना सांगितलं होतं. याची जबाबदारी पोलिसांची आहे. यासाठी रितसर पत्र पोलिसांना दिलं होतं. दीड तास झाल्यानंतर स्पीकरवरुन मी लोकांना आवाहन केलं की सर्वांनी आपापल्या घरी जावं, पोलीस आपलं काम करतील. पण, त्यावेळी ते तिथे आले. सत्कार स्वीकारला आणि पायी मिरवणूक काढायला सुरुवात केली. पोलिसांनी तेव्हाच त्यांना तिथून हाकलायचा पाहिजे होते, असं जाधव म्हणाले.

राणेंच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोखून धरला, तेव्हा पोलिसांवर कुठून तरी दडपण आलं. त्यामुळे पोलिसांनी आम्हाला मज्जाव केला. आमच्या बाजूने बॅरिकेड्स लावले. सगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर हे स्पष्ट होईल. आमचा एकही माणून रस्त्याच्या पलिकडे गेला नाही. पोलिसांना कालचा प्रकार रोखला आला असता, असं ते म्हणालेत.

निलेश राणेंनी केलेलं भाषण लोकांना हजारवेळा दाखवा. भाजपचे हेच संस्कार आहेत का? भाजपच्या अधिकृत व्यासपीठावरुन अशी शिविगाळ करण्यात आली आहे. राणेंनी याआधीही अनेकदा अशी शिविगाळ केली आहे. माझ्या भाषणामुळे हे प्रत्युत्तर त्यांनी दिल्याचं खोटं बोललं जातंय, असं भास्कर जाधव म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT