Gopichand Padalkar vs Ravi Patil  esakal
पश्चिम महाराष्ट्र

Jat Politics : 'या' मुद्द्यावरून भाजपच्या दोन गटांत तुफान राडा; आमदार पडळकर, रवी पाटील समर्थक आमने-सामने

सकाळ डिजिटल टीम

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून उफळलेला वाद शमविणे भाजपला चांगलीच डोकेदुखी ठरणार आहे.

जत : जतमध्ये भाजपच्या (BJP) बैठकीत भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) व विधानसभा प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांच्या गटात जोरदार राडा झाला. जत विधानसभा क्षेत्राचे प्रभारी रमेश देशपांडे यांच्या समोरच उघडपणे भाजपमधील गटबाजी उफाळून आला. या वादानंतर काही काळ तणावाचे वातावरणात निर्माण झाले होते.

दरम्यान, प्रभारी रमेश देशपांडे, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी, विधानसभा प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील व भाजप नेते प्रभाकर जाधव यांनी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना शांत करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून उफळलेला वाद शमविणे भाजपला चांगलीच डोकेदुखी ठरणार आहे.

जत विधानसभा क्षेत्राचे प्रभारी रमेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी चार वाजता येथील उमा नर्सिंग कॉलेज येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकारी, बूथ प्रमुख, वॉरियर्स यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत जत विधानसभा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे कसा घेता येईल यासंदर्भात चर्चा आणि उमेदवारी बद्दल पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येत होता. शिवाय, प्रत्येकाची मते जाणून घेण्यात येत होती.

दरम्यान, उमेदवारीवरून रवी पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांनी जतमध्ये भूमिपुत्रालाच संधी द्यावी, असा मुद्दा मांडला. याला आमदार पडळकर समर्थकांनी आक्षेप घेतला. यावरूनच वादावादीस सुरुवात झाली. बैठकीस भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार खडाजंगी आणि वादावादी होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. वाद विकोपाला जात असल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी, प्रभारी रमेश देशपांडे, तमनगौडा रवी पाटील, प्रभाकर जाधव, आप्पासाहेब नामद, दिग्विजय चव्हाण आदींनी कार्यकर्त्यांना शांत केले.

जत विधानसभेसाठी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर इच्छुक आहेत. जतमधून तमन्नगौडा रवी पाटील, प्रकाशराव जमदाडे, शंकर वगरे, डॉ. आरळी आदी इच्छुक आहेत. येथे पडळकर इच्छुक झाल्याने स्थानिक भूमिपुत्र व पडळकर समर्थक यांच्यात सहा महिन्यांपासूनच धुसफूस सुरू आहे. पक्षाने अजून कोणालाही उमेदवारी दिल्याचा शब्द दिला नसला तरी दोन्ही गटाकडून उमेदवारी आपणालाच असा दावा केला जात आहे.

सर्वांनाच मते मांडण्याचा अधिकार आहे. येथील भाजपचे पदाधिकारी डी. एस. कोटी यांनी भूमिपुत्राचा मुद्दा मांडताच येथे बाहेरून इच्छुक असणाऱ्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी भूमिपुत्रच का, असा आक्षेप घेत व्यासपीठावर येऊन वादावादी व राडा करण्याचा प्रकार केला. आज पक्षाला चांगले दिवस आणले आहेत. लोकसभेलादेखील पक्षाने ताकद दाखवली आहे. असे असताना बाहेरून येऊन येथे दादागिरी करण्याचा जो प्रकार सुरू आहे. तो खपवून घेणार नाही. या घटनेचा सविस्तर माहिती वरिष्ठ मंडळींच्या कानावर घालू.

-तम्मनगौडा रवी पाटील, विधानसभा प्रमुख

भाजपचे वरिष्ठ मंडळी जत विधानसभा निवडणुकीसाठी जो उमेदवार निश्चित करेल त्याचा एक संघ प्रमाणे काम करण्यासाठी प्रयत्नशील राहा. आपली मतं भिन्न असतील मात्र भाजपचा सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करायचे आहे. वाद वाढवून विरोधकांना संधी देण्यासारखे आहे. त्यामुळे जत विधानसभेचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर सर्वांनी एक संघपणे काम करूया.

-डॉ. रवींद्र आरळी भाजपचे ज्येष्ठ नेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfers: निवडणूक आयोगानं झापल्यानंतर आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या! लवकरच जाहीर होणार निवडणूक?

विधानसभेसाठी मनसेच्या तयारीपासून ते टीम इंडियातील खेळाडूला शिक्षेपर्यंत, वाचा आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

India vs Pakistan नोव्हेंबरमध्ये समोरासमोर? जाणून घ्या कोणती स्पर्धा अन् कुठे भिडणार

Nana Patole: हिंदुत्वाचं राजकारण नुसतं मतांसाठी करणार का? महायुतीवर नाना पटोले संतापले, काय म्हणाले?

Diwali Special Train: दसरा अन् दिवाळीसाठी मुंबईहून विशेष ट्रेन, जाणून घ्या २६ फेऱ्यांची माहिती

SCROLL FOR NEXT