Crop Damage Due To Heavy Rain in Sangli esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Rain : सांगली जिल्ह्याला 'अवकाळी'चा तडाखा; द्राक्षबागांना मोठा फटका, पावसाने जनजीवनही विस्कळित

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते.

सकाळ डिजिटल टीम

हवामान खात्याने (Meteorology Department) पावसाचा इशारा दिला आहे.

सांगली : शहरासह जिल्हाभरात काल (बुधवार) पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या. रात्री आठनंतर पाऊणतास झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले. रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने काही काळ वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. रात्री उशिरापर्यंत सरी कोसळत होत्या.

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याने (Meteorology Department) पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार आज दिवसभर सूर्यदर्शन क्वचितच झाले. दुपारनंतर हवेत गारवा होता. सायंकाळी प्रारंभी थोडावेळ पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रात्री आठनंतर सुरू झालेला पाऊस थांबून-थांबून सुरूच होता. त्यामुळे गावभाग, विश्रामबाग, पेठभाग, वखारभागातील रस्त्यांवर पाणी साचले होते.

सखल भागात साचलेल्या पाण्याने तळे निर्माण झाल्याचे दिसत होते. प्रामुख्याने मारुती चौक, स्टेशन रोडसह सिव्हिल रोडवर साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करताना वाहनधारकांची कसरत सुरू होती. हातगाडे, तसेच किरकोळ व्यवसाय ठप्प झाला होता. बिगरमोसमी पावसाने शहरातील वाहतूक संथ गतीने सुरू होती.

दरम्यान, जिल्हाभरात ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतीचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. विशेषतः द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हबकला आहे. रब्बी हंगामातील पिकांचेही जोरदार पावसाने नुकसान झाले.

उमदी परिसरात पावसाची हजेरी

उमदी परिसरात काल सायंकाळी सहा वाजता अर्धा तास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. पाऊस इतका जोरात होता की अवघ्या तीस मिनिटांमध्ये शिवारात पाणी मोठ्या प्रमाणात साचले. प्रमुख पीक रब्बी पीक असलेली ज्वारी अवकाळी पावसाने भुईसपाट झाली. वाऱ्याचा प्रभाव जोरात असल्याने शाळू, मका भुईसपाट झाला. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागा पुन्हा संकटात आहेत. ऑक्टोबरमध्ये फळ छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता द्राक्षतज्ज्ञांनी व्यक्त केली.

उमदी पूर्व भागात फुलोरा अवस्थेतील आणि निर्यातक्षम द्राक्षबागांना अवकाळी पावसाचा अधिक फटका बसणार आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका बसून शेतकऱ्यांना अपेक्षित दराहून कमी मिळण्याची शक्यता असल्याने मोठे आर्थिक नुकसान होणार आहे, असे द्राक्ष बागायतदार आणि द्राक्षशेती तज्ज्ञ रोहिदास सातपुते यांनी सांगितले. द्राक्ष व डाळिंब पिकांना महागडी औषध, ठिबक सिंचन, खते व रासायनिक खते यामध्ये मागील वर्षीपेक्षा तिप्पट वाढ झाल्याने शेतकऱ्यांना याची झळ बसत आहे.

कदमवाडीत द्राक्षबाग भुईसपाट

सलगरे : कदमवाडी (ता. मिरज) येथील मंगळवारी (ता. २८) झालेल्या अवकाळी पावसामुळे ओढण तार तुटून निर्यातक्षम झालेली द्राक्षबाग भुईसपाट झाली. त्यात चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कदमवाडी येथील विश्वनाथ संतराम कोरे यांचे दीड एकर बागेचे क्षेत्र आहे.

ऑगस्टमध्ये फळछाटणी घेतलेल्या बागेत मोठ्या प्रमाणात द्राक्षघड परिपक्व झालेले असतानाच वादळी वारा, अवकाळी पावसाने ओढणतार तुटून २० गुंठे क्षेत्रातील द्राक्षबाग भुईसपाट झाली. चार ते पाच दिवसांत मार्केटिंगसाठी आलेल्या द्राक्षबागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उर्वरित बाग वाचविण्यासाठी एक लाखांहून अधिक खर्च येणार असल्याचे विश्वनाथ कोरे यांनी सांगितले.

चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा ठेवली असताना अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने बागायतदार विश्वनाथ कोरे व त्यांचे कुटुंबीय हताश होऊन उर्वरित द्राक्षबाग वाचविण्यासाठी धडपडत होते. कृषी अधिकारी गायकवाड यांनी कोसळलेल्या द्राक्षबागेची पाहणी केली. नुकसानग्रस्त द्राक्षबागेचा अद्याप पंचनामा झाला नसला तरीही अवकाळी पावसाने अंदाजे ४ ते ५ लाखाचे नुकसान झाले आहे, असे बागायतदार कोरे यांनी सांगितले.

दुधोंडी परिसरात ढगाळ वातावरण

दुधोंडी परिसरात बुधवारी पहाटेच्या वेळी ढगाळ वातावरणातच दाट धुके पडले. दाट धुक्यांतून पहाटे फिरायला येणाऱ्या-जाणाऱ्यांसह पहाटेच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना धुक्याचा त्रास सहन करत पहाटेच्या वेळची कामे करावी लागली. मंगळवारी (ता. २८) दुधोंडी, घोगाव परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाचा हलकासा शिडकावा झाला होता. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच पहाटे ढगाळ वातावरणातच पडलेले आणि आता पडलेले धुके पाऊस घालवणारे की वाढवणारे, अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Video: चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; स्मृती इराणी घेणार सभा; नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : शिवसेना शिंदे गटाची जाहिरात, उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न?

गोफण | बॅगा तपासल्या अन् पैसे हरवले

Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

महाविकास आघाडीच्या 'त्या' सभेला शरद पवार का आले नाहीत? सांगण्यासारखंच काय असतं तर..; काय म्हणाले उदयनराजे?

SCROLL FOR NEXT