Big drop in sugarcane tonnage this year; Farmers are helpless 
पश्चिम महाराष्ट्र

यंदा उसाच्या टनेजमध्ये मोठी घट; शेतकरी हतबल

संजय गणेशकर

पलूस (जि. सांगली) ः महापूर, अवकाळी पाऊस, हुमणी आदीमुळे यंदा ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घटले आहे. एकरी 100 ते 130 टनांपर्यंत उसाचे उत्पादन घेणाऱ्यांना 20 टन किंवा त्याहून अधिक टन घटले आहे. पाऊस, खराब हवामानामुळे उसाची अपेक्षित वाढ झाली नाही. अपवाद वगळता एकरी 20 टनांपर्यंत उत्पादन घटले आहे. परिणामी शेतकरी हतबल झाले आहेत. 

उसाचे आगार असलेल्या पलूस तालुक्‍यातील उत्पादकांना अपेक्षित वजन मिळत नाही. द्राक्षाबरोबरच गोड उसाची कडू कहाणी ऐकायला मिळत आहे. तालुक्‍यात प्रामुख्याने ऊस, द्राक्षे, केळी, पपई, भाजीपाला, फुले अशी शेती केली जाते. उसाचे क्षेत्र जास्त आहे. सुमारे दहा हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. एक हुकमी पीक शेतकरी उसाकडे वळला आहे. कृष्णा, येरळा नदी आणि आरफळ योजनेचे पाणी तालुक्‍याला मिळते. उसाच्या उत्पन्नाबरोबरच जनावरांना चाराही ऊस शेतीतून मिळतो. म्हैस, गाई पालनाचा व्यवसाय वाढला.

दुग्धव्यवसायातून बऱ्यापैकी फायदा होतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महापूर, अवकाळी पाऊस, हुमणी व उसावरील विविध रोग यामुळे उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटल्याचे चित्र आहे. यावर्षी तर उसाचे एकरी उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. एकरी 100 ते 130 टनांपर्यंत उसाचे उत्पादन घेणारे शेतकरी तालुक्‍यात आहे. मात्र, यावर्षी पावसामुळे व खराब हवामानामुळे उसाची अपेक्षित वाढ झाली नाही. काही अपवाद वगळता एकरी 20 टनांपर्यंत उसाचे उत्पादन निघालेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. 

खते, औषध, मशागत, पाणी, मजुरीवर मोठा खर्च होत आहे. खराब हवामानाबरोबरच कारखान्यांकडून उसाची वेळेत तोडणी न झाल्याने उसाला तुरे येऊन वजनात घट येत आहे. चौदा ते अठरा महिन्यांनंतर उसाची तोडणी होत आहे. त्यामुळे उसाचे नुकसान होत आहे. शिवाय ऊस तोडणी मजूरही ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आर्थिक लूट करीत आहेत. ऊस तोडणीसाठी एकरी 5 हजारांपासून 10 हजार रुपयांपर्यंत ऊस तोडणी मजूर घेत आहेत. एकंदरीत यावर्षी ऊस शेतकरी यावर्षी अडचणीत सापडला आहे. सध्या गोड उसाची कडू कहाणी शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे. 

शेतकऱ्यांचे अनुभव... 
उत्पादक दत्तात्रय पाटील म्हणाले,""यंदा सप्टेंबरमधील अवकाळीने ऊस पडला अन्‌ अपेक्षित वाढ झाली नाही. तुरे आले. वजनामध्ये एकरी 15 ते 20 टन घट आली. गेल्यावेळी 90 टनांचा उतारा होता. यावर्षी 40 टनांपर्यंत वजन आले.'' प्रकाश कचरे म्हणाले,""नेहमीप्रमाणे 80 टन अपेक्षित होते. मात्र, 50 टन उतारा मिळाला. असाच अनुभव शाहुराज पाटील यांनी सांगितला. अरुण पुदाले यांनीही यंदा एकरी 20 टन उत्पादन घटल्याचे सांगितले.'' 

पावसाने मुळीची वाढ झाली नाही

यावर्षी सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसाने ऊस पडला. यामुळे वाढ झाली नाही. उसातील तण काढता आले नाही. खते देता आली नाहीत. जास्त पावसाने मुळीची वाढ झाली नाही. डिसेंबर महिन्यात उसाला तुरे आल्याने वजनात एकरी 15 ते 20 टनांपर्यंत यावर्षी घटली आहे. क्रांती कारखान्याची गेल्या वर्षी एकरी उसाची सरासरी 48 टन होती. मात्र, यावर्षी 35 टनांपर्यंत येईल.
- दिलीप पार्लेकर, शेती अधिकारी, क्रांती सहकारी साखर कारखाना, कुंडल. 

तालुक्‍यातील ऊस क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) 

  • 2015-16..... 9274 
  • 2016-17..... 8679 
  • 2017-18.....10136 
  • 2018-19.....10246 
  • 2019-20.... 10340 
  • 2020-21....10543 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT