Tomato Rate Today esakal
पश्चिम महाराष्ट्र

Tomato Rate : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; आता किलोचा दर आहे 'इतका'

अनेकांच्या जेवणातून नाहीसा झाला होता टोमॅटो

सकाळ डिजिटल टीम

बेळगावात यंदा टोमॅटोने १७० रुपये प्रतिकिलो दरापर्यंत मजल मारली होती. आता हा दर कमी झाला आहे.

बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Krushi Utpanna Bazar Samiti APMC) भाजी मार्केटमध्ये टोमॅटो दरात घसरण झाली. शनिवारी (ता. १२) प्रति ट्रे (२२ किलो) ८०० ते १२०० रुपयांना झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गत आठवड्यापासून टोमॅटोच्या दरात (Tomato Rate) मोठी घसरण होत आहे. गत आठवड्यात प्रति ट्रेचा दर १८०० ते २००० रुपये होता. होलसेल बाजारात दर कमी झाल्यामुळे किरकोळ बाजारात (Vegetable Market) देखील दर कमी झाले आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. बेळगावच्या किरकोळ बाजारात टोमॅटोचा दर १५० ते १७० रुपये प्रतिकिलो होता. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. मे महिन्याच्या मध्यावधीपासून टोमॅटोचा दर चढाच होता.

बेळगावात यंदा टोमॅटोने १७० रुपये प्रतिकिलो दरापर्यंत मजल मारली होती. आता हा दर कमी झाला आहे. बेळगावातील मार्केटमध्ये तालुक्याच्या पश्चिम, पूर्व भागासह महाराष्ट्रातील कोल्हापूर, कराड, सातारा, पुणे येथून टोमॅटो व भाजीपाला येतो. त्याचप्रमाणे गोवा व अन्य भागात बेळगावातून भाजीपाल्याची निर्यात होते.

या दोन्ही भाजी मार्केटमध्ये टोमॅटोची आवक अधिक आहे. आता दर कमी झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. यंदा टोमॅटो प्रति ट्रे २५०० रुपयांपर्यंत गेला होता. त्यामुळे अनेकांच्या जेवणातून टोमॅटो नाहीसा झाला होता. आता टोमॅटोचे दर पूर्वपदावर आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT