The bridge at Valvan was carried away 
पश्चिम महाराष्ट्र

वलवण येथील पूल गेला वाहून, नागरिकांची ये-जा करताना कसरत

सदाशिव पुकाळे

झरे : वलवण (ता. आटपाडी) येथील कारंडेवस्ती ते बेरगळवाडी जाणारा रस्ता वलवण येथील शिंदेनगर येथील रस्त्यावरचा पूल कॅनॉलच्या पाण्यामुळे व सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वाहून गेला आहे. शिवाय या वस्ती वरून वलवणकडे जाणारा सुमारे चार किलोमीटरचा रस्ता व बेरगळवाडीला जाणारा सुमारे तीन किलोमीटर रस्ता अतिशय खराब झाला आहे.

त्यामुळे तेथील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. आज आटपाडी पंचायत समितीच्या सभापती डॉ. भूमिका बेरगळ यांनी प्रत्यक्ष जाऊन पुलाची पाहणी करून ताबडतोब उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. 

यावेळी वलवण गावचे सरपंच दगडू गेजगे, उपसरपंच मारुती जाधव, ग्रामपंचायत सदस्य शरद कारंडे, पोलीस पाटील सुहास शिंदे, ग्रामसेवक गिरीश पांढरे, वलवण गावातील नागरिक आत्माराम शिंदे, विजय कारंडे, अमोल कारंडे, अशोक जाधव, तानाजी पोळ, सुखदेव शिंदे, राजाराम शिंदे आदी उपस्थित होते. दरम्यान, येथील संपूर्ण रस्ता वाहून गेला आहे. तसेच टेंभूचे पाणी सुटल्यानंतर रस्ता पाण्याखाली जातोय. त्यामुळे नागरिकांना ये-जा करता येत नाही. याबाबत आमदार अनिल बाबर, सभापती डॉ. भूमिका बेरगळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून लवकरच पुल बांधून देण्याचे आश्वासन दिले.  


संपादन : प्रफुल्ल सुतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Video: चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; स्मृती इराणी घेणार सभा; नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : शिवसेना शिंदे गटाची जाहिरात, उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न?

Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

महाविकास आघाडीच्या 'त्या' सभेला शरद पवार का आले नाहीत? सांगण्यासारखंच काय असतं तर..; काय म्हणाले उदयनराजे?

Holiday Fun Ideas : सुट्टीच्या दिवशी घरी करा 'ही' 5 हलकी-फुलकी कामे, मूड होईल एकदम फ्रेश

SCROLL FOR NEXT