Pramod Jadhav sakal
पश्चिम महाराष्ट्र

Erandoli Crime : एरंडोलीत तरुणाचा निर्घृण खून; पाठीत, मानेवर गंभीर वार, हल्ल्याचे कारण अस्पष्ट

सकाळ वृत्तसेवा

एरंडोली - येथील एरंडोली-आरग रस्त्यावरील शाबु फॅक्टरी जवळील झुडपात तरुणाचा मानेवर पाठीत चाकू, कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. प्रमोद वसंत जाधव (28, रा. एरंडोली) असे मृत तरूणाचे नाव आहे. रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली. रात्री उशीरा पोलिसांचे पथक दाखल झाले असून पंचनामा उशीरापर्यंत सुरू आहे. दरम्यान, हल्ल्याचे नेमके कारण रात्री उशीरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मृत प्रमोद जाधव हा एरंडोलीतील जाधव वस्तीवर राहण्यास आहे. त्याचा जेसीबीचा व्यवसाय आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे घरातून जनावरे चरण्यासाठी बाहेर पडला होता. सायंकाळी उशीरापर्यंत घरी परतला नाही. यामुळे घरच्यांनी शोध सुरू आहे.

दरम्यान, आज दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात मोठ्याप्रमाणावर चिखल झाला होता. अखेर साडेआठच्या सुमारास आरग रस्त्यावरील झुडपात जाधव याचा मृतदेह दिसून आला. रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह दिसल्याने खळबळ उडाली. याबाबत तातडीने मिरज ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आले.

उपाधीक्षक प्रणील गिल्डा, निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मानेवर गंभीरस्वरूपाचे वार दिसून आले. तातडीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. रात्री उशीरापर्यंत पंचनामा सुरू होता.

हल्ल्याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नव्हते. खुनाची घटना समोर आल्यानंतर बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोषित पसरली. त्यामुळे खळबळ उडाली. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला असावा, याचा तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Backward Class Reservation : मागासवर्गीयांच्या जागेचे आरक्षण बदलासाठी सूचना! नवीन वाद उद्भवण्याची शक्यता

राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा 60 फूट उंच तलवारधारी पुतळा उभारण्यात येणार; आयुर्मान असणार 100 वर्षे

Viral Video: डॉक्टरांच्या वार्षिक परिषदेत तरुणीचा डान्स; सोशल मीडियावर चर्चेला फुटलं तोंड; पाहा व्हिडिओ

Virat Kohli Ranji Trophy : विराट कोहलीची रणजी संघासाठी संभाव्य खेळाडूंमध्ये निवड, २०१९ नंतर प्रथमच देशांतर्गत क्रिकेट खेळणार?

Share Market Opening: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; सेन्सेक्स 160 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT