बैलगाडी शर्यत होणारचं आजही, आताही असे आमदार पडळकर ठामपणे सांगितले आहे.
झरे : आटपाडी (aatpadi) येथे संचार बंदीमुळे सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट आहे. व्यापाऱ्यांना दुकाने आज सकाळपासूनच बंद ठेवली आहेत. परंतु आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी आहे. यावेळी गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) म्हणाले, उद्या बैलगाडी शर्यत कसल्याही परिस्थितीत होणार आहेत. त्यामुळे प्रशासनावर ताण निर्माण झाला आहे. झरे आणि परिसरात सर्वत्र नाकाबंदी केली आहे.
खरसुंडीकडून येणारा रस्ता, आटपाडी, कराड पंढरपूर महामार्गावरही नाकाबंदी केली आहे. दिघंची, माण तालुक्यातुन येणारे रस्ते तसेच खटाव तालुक्यातून येणाऱ्या सर्व रस्त्यांवर अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. बैलगाडी शर्यत होणारचं आजही, आताही असे आमदार पडळकर ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा उद्याच्या शर्यतीकडे लागल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.