पश्चिम महाराष्ट्र

Coronavirus : कऱ्हाड, फलटण, सातारा, लाेणंदमधील 13 जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : जीवनावश्यक वस्तु खेरीज इतर दुकाने वारंवार आवाहन करुनही शनिवारी (ता.21) सुरुच ठेवल्याप्रकरणी शहरातील तीन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. जिल्ह्यात पहिल्यांदाच असा गुन्हा कऱ्हाडमध्ये दाखल झाला. त्यानंतर जिल्ह्यातील काही गावांमध्ये देखील गुन्हे दाखल झाले आहेत. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गर्दी न करण्याचे, आवश्यक असल्यासच बाहेर पडण्याचे,  अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचेही आदेश केले आहेत. त्याची येथील बाजारपेठेत त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानुसार बाजारपेठेतील आत्यावश्यक सेवेची दुकाने व मेडीकल वगळता अन्य दुकाने, हॉटेल पोलिसांनी बंद केली. त्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी स्वतः बाजारपेठेत व्यापाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात आवाहन केले.

पोलिसांनी वारंवार आवाहन करुनही दोन व्यापाऱ्यांनी दुकाने सुरुच ठेवली. त्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विकास लक्ष्मण देसाई (वय 48, रा. काले), राजेश उत्तमराव पाटील (40, रा. कऱ्हाड), अनिल रामदास तांबे (54, रा. कार्वेनाका) या तीन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी आज दिली.

हेही वाचा : असे चालणार सातारा जिल्ह्यातील बॅंक, पतसंस्थांचे व्यवहार

लोणंद : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या बंदच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष चौधरी यांनी शनिवारी (ता.21) येथील आठ दुकानदारांवर दुकाने चालू ठेवल्याने गुन्हा दाखल करून या सर्वांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान उदया (ता. २२) देशभरात जरी करण्यात आलेल्या कर्फ्यू च्या बंदोबस्ताचीही लोणंद पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली आहे.

घरी बसून कंटाळलाय? थांबा, सकाळ माध्यम समूह घेऊन आलाय सरप्राईज!

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सोमवर आणि गुरुवार सोडून अन्य दिवशी दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशाचे येथील सावतामाळी हॉटेलचे अशोक रघुनाथ वाडकर ( रा. लोणंद), नीरा -लोणंद रस्त्यावरील राजधानी हॉटेलचे अभिषेक राजेंद्र शेळके, माऊली हॉटेलचे बाळासाहेब धोंडीबा केसकर (रा. बावकलवाडी), शिवांजली बिअर शॉपिचे राजेश धोंडीबा शिंदे (रा.लोणंद), माऊली एंटरप्रायजेस मोबाईल शॉपीचे प्रज्वल बब्रुवान माचवे ( रा. लोणंद), हेरंब बाईक पॉईंट मोटारसायकल गॅरेजचे नितिन गोरखनाथ शिंदे ( रा. सालपे),पूजा इलेक्ट्रॉनिक्स दुकानचे कैलास सुजाराम देवासी ( रा. लोणंद) व जय मोबाईल शॉपीचे अनिल गणपत शिंदे (रा. अंदोरी) आदी आठ जणांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचे उल्लंघन केल्याने या सर्वावर गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणंद पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे.

वाचा : सातारा : सैन्य दलातील जवानांच्या सुटीस मुदत वाढ 

फलटण विभागाचे पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री. चौधरी यांचेसह त्यांचे सहकारी सहाय्यक पोलिस फौजदार यशवंत महामुलकर, पोलिस हावलदार श्री. सपकाळ, ज्ञानेश्वर मुळीक, फैय्याज शेख, अविनाश शिंदे, शिवाजी सावंत व विजय शिंदे आदींनी केली. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे सर्वांनीच काटेकोरपणे पालन करुन सहकार्य करावे अन्यथा या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष चौधरी यांनी दिला आहे.

फलटण शहर : जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असतानाही हॉटेल सुरू ठेवून आदेशाचा भंग केल्याप्रकरणी येथील हॉटेल लक्ष्मी खानावळचे चालक अनिल बाबूराव शिंदे यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन लागू केला असून, हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानाही काल रात्री साडेनऊच्या सुमारास हॉटेल लक्ष्मी खानावळ उघडे असल्याचे दिसून आले. 

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उफळी (ता. सातारा) येथील साठे फार्म हाउसचे मालक अजित प्रभाकर साठे यांच्यावर सातारा तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश डावलून उफळी येथील साठे फार्म हाऊसवर 17 लोकांनी एकत्र येऊन गर्दी केली होती, तसेच खाद्यपदार्थाची विक्रीही करत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी फार्म हाऊसचे मालक अजित साठे यांच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार राजेंद्र तोरडमल यांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT