Lampi Disease Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangali ; ‘लम्पी स्कीन’बाबत पशुपालकांनी दक्ष राहावे; तहसीलदारांचे आवाहन

‘लम्पी’ची लक्षणे जनावरांत आढळून आल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा

सकाळ वृत्तसेवा

विटा : येथील तहसील कार्यालयात तालुकास्तरीय लम्पी स्कीन नियंत्रण समितीची सभा तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गटविकास अधिकारी संदीप पवार, सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. एम. बी. गवळी, पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. के. मणेर, पोलिस निरीक्षक संतोष डोके, बाजार समिती सचिव प्रकाश जाधव उपस्थित होते.

लम्पी चर्मरोग संनियंत्रण समिती सदस्य गवळी व डॉ. मणेर यांनी याविषयी माहिती दिली. डॉ. गवळी यांनी लक्षणे सांगितली. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनावरांचे गोठे व त्या लगतच्या परिसरामध्ये डास, गोचीड, माशा यांच्या नियंत्रणासाठी औषध फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तहसीलदार शेळके यांनी जनावरांचे बाजार, प्रदर्शन व शर्यती आयोजित करण्यास मनाई केल्याचे सांगितले. ‘लम्पी’ची लक्षणे जनावरांत आढळून आल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा, असे आवाहन तालुकास्तरीय लम्पी चर्मरोग सनियंत्रण समितीच्या वतीने करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT