पश्चिम महाराष्ट्र

‘महापरीक्षा’ पोर्टलद्वारे भरती परीक्षेत सामूहिक कॉपी

प्रमोद फरांदे

कोल्हापूर - शासकीय सेवेतील वर्ग ‘क’ आणि ‘ड’च्या भरतीसाठी पारदर्शकता आणण्याच्या नावाखाली राज्य शासनाने ‘महापरीक्षा’ पोर्टल सुरू केले; मात्र या पोर्टलद्वारे घेतल्या जात असलेल्या परीक्षांवेळी सामूहिक कॉपीचा प्रकार घडत असून, पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे हे प्रकार होत असल्याचे उघड झाले आहे.

राज्यभरातून परीक्षार्थींच्या तक्रारींचा पाऊस शासनाकडे पडत आहे. त्यामुळे ‘महापरीक्षा’ पोर्टलच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रामाणिक, कष्टाळू तरुणांचे भविष्य अंधारात लोटणाऱ्या या प्रकारामुळे तरुणांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. महापरीक्षा पोर्टल विरोधात तरुण आंदोलनाच्या पवित्र्यात असून, उद्यापासून पुण्यातून आंदोलनाला प्रारंभ होत आहे.

राज्यातील नगरपालिकांतील विविध पदांच्या सुमारे १६०० जागांसाठी महापरीक्षेमार्फत १९ आणि २१ तारखेला ऑनलाइन मुख्य परीक्षा घेण्यात आली. विशेष म्हणजे त्यासाठी काही खासगी परीक्षा केंद्रांवरही या परीक्षा झाल्या. या परीक्षेत कोल्हापूरसह नागपूर, यवतमाळ आदी  ठिकाणी सामूहिक कॉपीचे प्रकार घडल्याच्या तक्रारी पुराव्यासह परीक्षार्थींनी केल्या आहेत.

कोल्हापूर  जिल्ह्यात पेठवडगाव, कोपार्डे आदी ठिकाणी परीक्षा घेतली गेली. सकाळी ७.३० वाजता रिपोर्टिंग असताना काही ठिकाणी खासगी परीक्षा केंद्रच ९ वाजता सुरू झाले. त्यानंतर उशिरा पेपर सुरू झाला. अनेकांनी एकत्र बसून परीक्षा दिली.

महापरीक्षा पोर्टल गैरप्रकाराबाबत प्रत्येक जिल्ह्यात निवेदने दिली जात आहेत. प्रामणिक विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी ही परीक्षा रद्द करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षा घेतल्या जाव्यात, यासाठी आम्ही आंदोलन करणार आहे.
- समाधान मासाळ,
परीक्षार्थी

न्यायवैद्यक परीक्षेतही गोंधळ 
एप्रिलमध्ये न्यायवैद्यक प्रयोगशाळेची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये एकच पेपर पुन्हा दिल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या; मात्र त्याची दखल ‘महापरीक्षे’ने घेतली नाही. आवडाभरानंतर पेपर रिपीट झाल्याचे महापरीक्षेच्या लक्षात आल्यानंतर संबंधित पेपरची पुन्हा परीक्षा झाली.

प्रतिसाद कॉपीच नाही
परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्याने कोणते प्रश्‍न सोडविले, याबाबतची प्रतिसाद कॉपी दिली जाते. यापूर्वी महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन मार्फत घेतल्या गेलेल्या विविध भरती परीक्षांमध्ये प्रतिसाद कॉपी, उत्तरपत्रिका दिली जात होती. शिवाय या परीक्षा पुरेशा साधन सुविधांसह महाविद्यालयातच घेतल्या जात होत्या. महापरीक्षेची स्थिती मात्र याउलट आहे. विद्यार्थ्यांनी कोणता प्रश्‍न सोडविला याची माहिती देणारी प्रतिसाद कॉपी व उत्तरपत्रिका दिली गेली नाही. खासगी नेट कॅफेतही परीक्षा घेतली गेली. या परीक्षांत काही मुलांची वेगळी व्यवस्था केल्याच्या तक्रारीही निवेदनात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

SCROLL FOR NEXT