Collector reviews sanitation of the city marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

स्वच्छ नगरसाठी "मोठे साहेब'च मैदानात

विनायक लांडे

नगर : प्रशासकीय यंत्रणेने शहरात युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम सुरू केली. अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तब्बल दीड हजार लोकांचा ताफा याच कामाला लागला. शहरातील प्रत्येक प्रभागात यंत्रणेतर्फे जनजागृतीही सुरू आहे.

कचरामुक्त शहरासाठी मोठ्या प्रमाणात घंटागाड्या सुरू करूनही ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिग दिसत आहेत. काही नागरिकांचा हलगर्जीपणाही प्रकर्षाने समोर आल्यावर ही बाब मोठ्या साहेबांकडे गेली. कडक शिस्तीच्या साहेबांनीही मग भल्या सकाळीच शहरातील स्वच्छतेची झाडाझडती घेत, दोषींवर दंडात्मक कारवाईचा आदेश दिला. मैदानात उतरून कारवाई करणारे हे साहेब म्हणजे, चक्क महसूल विभागाचे "कमाडंर' दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त राहुल द्विवेदी होय! 

नगरकरांच्या मानसिकतेची परीक्षा

शहरातील आठही प्रभागात सकाळी आठ ते दहा या वेळेत स्वच्छता मोहीम राबविली जाते. यंदाच्या स्वच्छ भारत अभियानातील सर्वेक्षण 4 ते 31 जानेवारीपर्यंत आहे. या कालावधीत स्वच्छता सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेले केंद्रीय पथक कोणत्याही क्षणी शहरात धडकू शकते. या पार्श्‍वभूमीवर शहरात स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर राबविली जात आहे. स्वच्छतेबाबत निरीक्षणानंतर हे पथक अहवाल सादर करील. पथकाद्वारे नगरकरांच्या स्वच्छताविषयक मानसिकतेची व कृतिशीलतेची परीक्षा घेतली जाणार आहे. 

नियम पाळण्याबाबत दुकानदारांना तंबी

गुरुवारच्या सकाळच्या मोहिमेत तब्बल 200 कचऱ्याचे ढीग हटविण्यात आले. प्रेमदान चौक, चितळे रोड, डीएसपी चौक, आंबेडकर चौक परिसरासह शहरातील तीनही बसस्थानकांचा स्वच्छताविषयक आढावा घेण्यात आला. माळीवाडा बसस्थानकाची जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी पथकातील अधिकाऱ्यांसह पाहणी केली. बसस्थानकातील दुकानदारांना स्वच्छतेविषयीचे नियम काटेकोरपणे पाळण्याची तंबी द्विवेदी यांनी दिली. महापालिका उपायुक्त सुनील पवार, नगररचनाकार राम चारठणकर, सहायक फौजदार हरीश पाटे आदी उपस्थित होते. 

प्लॅस्टिक आढळल्याने पाच हजारांचा दंड

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी माळीवाडा बसस्थानक परिसरात स्वच्छतेचा आढावा घेतला. त्यात त्यांना एका फळविक्रेत्याकडे प्लॅस्टिक आढळून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने त्यास पाच हजार रुपयांचा दंड केला. महापालिका पथकाने जागेवरच हा दंड वसूल केला. 

नगरकरांचीही जबाबदारी 
स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेंतर्गत शहर स्वच्छ व सुंदर राखणे हा हेतू आहे. स्वच्छता ही केवळ यंत्रणेची जबाबदारी नसून, लोकांचीही आहे. कचरामुक्त, हागणदारीमुक्त शहरासाठी नगरकरांनीही कर्तव्यबुद्धीने स्वच्छतेच्या कामात सहयोग देणे अपेक्षित आहे. 
- सुनील पवार, उपायुक्त, महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT