पश्चिम महाराष्ट्र

शाब्बास रे पठ्ठया ! चालत्या ट्रेनमधून उडी मारुन चाेरट्यास पकडले

सकाळ वृत्तसेवा

वडूज (जि.सातारा) : मुंबईत लोकल ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील चैन घेऊन धावत्या ट्रेनमधून उडी मारून पलायन करणाऱ्या एका चोरट्यास पोलीस कर्मचारी राहुल जाधव यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून धावत्या ट्रेन मधून उडी मारून त्या चोरट्यास पकडले. पोलीस कर्मचारी श्री. जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील वडूज येथील रहिवासी असून त्यांनी दाखविलेल्या धाडशीपणाचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
 
वडाळा येथील रुपाली मळेकर या मस्जिदबंदर येथे एका कंपनीत नोकरीस आहेत. कंपनीतील काम संपल्यानंतर त्या तेथून वडाळा याठिकाणी जाण्यासाठी ट्रेन मध्ये चढल्या होत्या. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या काही महिला मैत्रिणीदेखील होत्या. त्या डाऊन वाशी लोकलमधील महिलांच्या राखीव डब्यातून प्रवास करीत होत्या. ट्रेन सुरू होताच विकलांग डब्यातून प्रवास करणाऱ्या एकाने रुपाली यांच्या गळ्यातील दीड तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावून चालत्या ट्रेनमधून फलाटावर उडी मारली. त्यावेळी त्या ट्रेनच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांनी व फलाटावरील इतर महिलांनी चोर चोर असा आरडाओरडा केला. मात्र ट्रेनचा वेग वाढल्याने रुपाली यांना त्यामधून उतरता आले नाही. नंतर ती ट्रेन पुढेशिवडी स्टेशन याठिकाणी आल्यानंतर रुपाली व त्यांच्या सहकारी महिला मैत्रिणींनी स्टेशनवर गणवेशात असलेल्या पोलिसांना घडलेला चोरीचा प्रकार सांगितला.

पोलिसांनी तात्काळ घटना घडलेल्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यावेळी आम्ही याठिकाणी एका इसमास पकडले असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना देत रुपाली यांना वडाळा पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. ज्या लोकल ट्रेनमधून रुपाली या प्रवास करीत होत्या. त्याच लोकल मध्ये वडूज येथील रहिवाशी असलेले व सध्या मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत असलेले राहुल संजय जाधव प्रवास करीत होते. ज्यावेळी महिलांनी चोर चोर असा आरडा ओरडा केला त्यावेळी राहुल यांनी धावत्या ट्रेन मधून उडी मारली होती. व त्याठिकाणी कार्यरत असलेल्या एका महिला पोलिसांच्या मदतीने त्या चोरास पडकले होते.

वाचा : महत्वाची बातमी : वृत्तपत्रामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही!

पकडलेल्या व्यक्तीस रुपाली यांनी व त्यांच्या मैत्रिणींनी ओळखून यानेच चैन हिसकावल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्या इसमाची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे दीड तोळे वजनाची सोन्याची चैन सापडली. राहुल जाधव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून व क्षणाचाही विलंब न लावता धावत्या ट्रेन मधून उडी मारून त्या चोरास पकडल्याने रुपाली यांची चोरीस गेलेली सोन्याची चैन त्यांना परत मिळाली. 

हेही वाचा : परिस्थितीमुळे जे वडिलांना जमू शकले नाही ते मुलीने करुन दाखवलं
 

श्री. जाधव यांच्या धाडसामुळे मळेकर यांची सोन्याची चैन परत मिळाली. जाधव हे येथील रहिवासी असून ते सात वर्षांपासून मुंबईत पोलीस दलात सेवेत आहेत. ही घटना साेमवारी (ता.16) घडली हाेती. धाडसी स्वभावामुळे जाधव हे वडूज परिसरातील नागरिकांना माहिती आहेत. जाधव यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून चोरास पकडल्याने त्यांच्या धाडसीपणाबद्दल नागरिकांतून कौतुक होत आहे. याबाबत वडाळा पोलीस ठाण्यात मुकेश मंजी वाघरी याच्याविरोधात रुपाली मळेकर यांनी गुन्हा दाखल केला आहे.


जाधव बंधूंचा धाडसी व प्रामाणिकपणा

राहुल हे मुंबई पोलीस दलात तर त्यांचे धाकटे बंधू अतुल जाधव रेल्वे पोलीस सेवेत नोकरीस आहेत. त्यांचे शिक्षण माध्यमिक शिक्षण येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात झाले आहे. लहानपणापासून दोघेही धाडसी व मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. अतुल यांनीही गेल्या काही महिन्यांपूर्वी रेल्वे फलाटावर सापडलेल्या बॅगेतील 68 हजारांचा मुद्देमाल परत करून प्रामाणिकपणा दाखवला होता. जाधव बंधूंच्या या धाडसी व प्रामाणिकपणाचे नागरिकांतून कौतूक होत आहे.


सातारा : खासदार उदयनराजेंनी केला मानाचा मुजरा

तारळेचा आठवडी बाजार रद्द, ग्रामपंचायत कडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना

तारळे : कोरोना विषानुचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलेल्या आवाहनानूसार जिल्ह्यात विविध गावचे आठवडी बाजार रद्द करण्यात आले आहेत. त्यानूसार तारळेचा शनिवारचा आठवडी बाजार रद्द करण्यात आल्याची माहिती सरपंच मीनाताई परदेशी व उपसरपंच रामचंद्र देशमुख यांनी दिली.

ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत बोलताना उपसरपंच रामचंद्र देशमुख म्हणाले की, कोरोना रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेवढे प्रशासनाची जबाबदारी आहे तेवढीच प्रत्येक ग्रामस्थाची देखील आहे. यासाठी तारळे ग्रामपंचायत स्तरावर विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यात घंटागाडी वरील स्पीकरद्वारे जनजागृती, भित्तीपत्रके, फ्लेक्स बोर्ड, लावण्यात आले आहेत. गर्दी टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भरणारा आठवडी बाजार रद्द केला आहे.

याची नोंद ग्राहक व व्यापाऱ्यांनी ठेवावी. गावातील सलून दुकाने बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. बसस्थानक व आंबा चौक परिसरात लोकांनी गर्दी करणे टाळावे. तसेच आवश्यक व नोकरी निमित्ताने बाहेर ये जा करणारांना ग्रामपंचायतीच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाला तारळे ग्रामपंचायतीच्या कडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. ग्रामस्थांनी देखील आपली जबाबदारी पार पडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT