Controversy over selection of teachers bank office bearers 
पश्चिम महाराष्ट्र

शिक्षक बॅंक कारभाऱ्यांच्या निवडीला वादाचे गालबोट 

दौलत झावरे

नगर : प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरळीत पार पडली. मात्र, त्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत विकास मंडळाच्या मुद्द्यावरून दहा मिनिटे शाब्दिक वादावादी झाली. त्यानंतर सभा पुन्हा सुरळीत झाली. 

प्राथमिक शिक्षक बॅंकेमध्ये गुरुमाऊली मंडळाची सत्ता होती; परंतु काही कारणांवरून "गुरुमाऊली'च्या संचालक मंडळात वाद झाले. त्याच वेळी रावसाहेब रोहकले सेवानिवृत्त झाल्यानंतर सात संचालकांचा गट त्यांच्याबरोबर गेला, तर 13 जणांचा गट बापूसाहेब तांबे यांच्याबरोबर राहिला. गेले सहा महिने रावसाहेब रोहकले गट तटस्थ होता.

या सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांबरोबरच सभासदांची होती. त्यानुसार आज झालेल्या निवडीत दोन्ही गट एकत्र आले. त्यामुळे ही निवडप्रक्रिया बिनविरोध पार पडली. विकास डावखर यांनी विकास मंडळाचा विषय काढला. उपस्थितांनी त्यांच्या मुद्द्यांना आक्षेप घेतला. त्या वेळी डावखर यांनी नाराजी व्यक्त करीत सभागृह सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांची अन्य नेतेमंडळींनी समजूत घातल्यानंतर वाद मिटला. 

चार महिन्यांसाठीच निवडी 
प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडी फक्त चार महिन्यांसाठीच आहेत. त्यानंतर नव्याने अध्यक्ष- उपाध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. सर्वांना संधी मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

"विकास'साठी सर्व एकत्र 
विकास मंडळामार्फत सुरू असलेल्या कामांसाठी शिक्षक बॅंकेतून मदत व्हावी, यासाठी "गुरुमाऊली'तील रावसाहेब रोहकले गटाने बापूसाहेब तांबे यांच्या गटाबरोबर हातमिळवणी केली. त्याला तांबे गटानेही सहकार्य करण्याचे धोरण घेतले. 

बॅंकेचा कारभार चांगला सुरू असताना दोन गट राहण्याऐवजी सर्वांनी एकत्र यावे, अशी इच्छा कार्यकर्ते व सभासदांची होती. त्यामुळे बॅंकेच्या व सभासदांच्या हितासाठी आम्ही पुन्हा एकत्र आलो आहेत. 
- बापूसाहेब तांबे, शिक्षक नेते 

बॅंकेत चार वर्षे चांगले काम झाले. यापुढेही असेच सुरू राहावे, ही संचालकांसह सर्वांची इच्छा आहे. तसेच, विकास मंडळाच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या इमारतीच्या कामास बॅंकेकडून सहकार्य केले जाणार आहे. 
- प्रवीण ठुबे, जिल्हाध्यक्ष, राज्य प्राथमिक शिक्षक संघ 

शिक्षक बॅंकेच्या निवडप्रक्रियेवर सभेत बोलणे अपेक्षित होते; परंतु त्यात विकास मंडळाचा विषय घेणे गरजेचे नव्हते. विकास मंडळाला निधी वर्ग करण्यासंदर्भात स्वतंत्रपणे बैठक घेण्यात येणार आहे. 
- सलीमखान पठाण, ज्येष्ठ संचालक, प्राथमिक शिक्षक बॅंक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT