सांगली : पतसंस्थांतील ठेवींना वीमा संरक्षणासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्याबाबत राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने त्यांची भेट घेतली. आता त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारकडे या विषयाचा ताकदीने पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती सांगली ट्रेडर्स सोसायटीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
बारामतीत गोविंदबाग येथे फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांशी श्री. पवार यांनी सविस्तर चर्चा केली. तेथे अध्यक्ष काका कोयटे, सुरेश वाबळे, सर्जेराव शिंदे, राजेंद्र कांचन, सौ. भारती मुथा, सुरेश लवांडे आदी उपस्थित होते. सुरेश पाटील म्हणाले, 'नागरी सहकारी आणि खासगी बँकांतील ठेवींना पाच लाखांपर्यंत संरक्षणाचे रिझर्व्ह बँकेचे धोरण आहे. परंतु सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या पतसंस्थांतील ठेवींना संरक्षण नाही. नगर जिल्ह्यात लिक्विडिटी बेस डिपॉझिट प्रोटेक्शन फंड या नावाने त्या जिल्ह्यातील पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण आहे. त्याच धर्तीवर राज्यभर संरक्षण देणारी योजना राज्य शासनाकडे आम्ही सादर केली आहे. त्यात एका वेगळ्या संस्थेला मान्यता देऊन त्याव्दारे वीमा संरक्षण शक्य असल्याचा मुद्दा सहकार परिषदेचे अध्क्ष विद्याधर अनास्कर यांनी मांडला आहे.'
ते म्हणाले, 'नाबार्डच्या विविध योजनाही पतसंस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. या दोन्ही विषयांत पवार यांनी पुढाकार घेण्याचा शब्द दिला असून राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.