corona statement of sambhaji bhide jayant patil said fitting he in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

'संभाजी भिडे यांच्यावर कारवाई होणार'

अजित झळके

सांगली : देशाच्या पंतप्रधानांपासून सामान्य माणसापर्यंत सर्वजण कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. अशावेळी समाजाला आणि सरकारला अडचणी निर्माण होतील, अशी विधान खपवून घेतली जाणार नाहीत. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची तपासणी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

संभाजी भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोलताना 'कोरोना हा आजार नसून तो मानसिक रोग आहे. जी माणसे कोरोनाने मेली ती जगण्याच्या लायक नव्हती', असे धक्कादायक विधान त्यांनी केले होते. त्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर जयंत पाटील म्हणाले, 'जो माणूस आंबा खाल्याने मुले होतात, असे म्हणतो, त्याच्याबाबत काय बोलायचे? अर्थात, आंब्यापर्यंत विषय ठीक होता, मात्र त्यांनी कोरोनासारख्या गंभीर विषयाबाबत केलेले विधान धक्कादायक आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोना झाला, मग संभाजी भिडे त्यावर ते शब्द वापरणार का? त्यांचे सारे शब्द निषेधार्ह आहेत. समाजाच्या कोरोना विरोधी प्रयत्नांमध्ये या विधानांनी बाधा आली आहे. त्याबाबत योग्य ती यंत्रणा तपासणी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करेल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT