सातारा : कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक योजनेचा भाग म्हणून नागरिकांनी एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयात येणारे अभ्यांगतांचे गर्दीचे नियंत्रण राखणे आवश्यक आहे. यासाठी 31 मार्चपर्यंत अभ्यांगतांना शासकीय, निमशासकीय कार्यालयात आवश्यकतेप्रमाणे अतितातडीचे काम असेल तर प्रवेश द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
जिल्हास्तरावर, क्षेत्रीयस्तरावर सर्वसामान्य जनतेस शासकीय माहिती अथवा इतर आवश्यक बाबींसाठी अर्जाद्वारे कार्यवाही करावयाची असेल गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्वसमान्य जतनेने शासकीय कार्यालयात न जाता ई-मेलद्वारे अर्ज करावेत व माहिती प्राप्त करुन घ्यावी. यासाठी संबंधित विभागाने सामान्य जनतेसाठी शासकीय कार्यालयातील ई-मेल आयडी व दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन द्यावेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार करण्यासाठी ई-मेल collectorofficesataragmail.com असा आहे. क्षेत्रीय स्तरावरुन अत्यंत तातडीचे टपाल, संदेश हे ई-मेलद्वारे पाठविण्यात यावे.
सर्वसमान्य जनतेकडून ई-मेलद्वारे प्राप्त होणाऱ्या अर्जांवर नियमानुसार विहित मुदतीत उचित कार्यवाही करुन अर्जदारांना कळविणे संबंधित शाखा, विभागांची जबाबदारी राहील. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये असणारे कर्मचारी यांनी काम करत असताना कागदपत्र व हस्तांदोलन यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी कार्यालयांमध्ये वेळोवेळी सॅनिटायझरचा, हॅन्डवॉशचा वापर करावा. शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. तसेच कार्यालयातील कर्मचारी यांनी आपले संकलन, विभागामध्ये स्वच्छता पाळावी. वैयक्तिक सुनावणीस एखादी व्यक्ती गैरहजर राहिली म्हणून प्रकरणे, केस निकाली न काढता त्याला वैयक्तिक हजेरीमध्ये सूट देऊन कोरोना संक्रमण कालावधीनंतर पुढील तारीख देण्यात यावी. या बाबींची अंमलबजावणी 31 मार्च कालावधीतपर्यंत करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आठवडे बाजार भरवताना मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही याची दक्षता जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, नगर परिषद, नगर पंचायतींच्या मुख्याधिकारी व बाजार समितीच्या सचिवांनी घ्यावी, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.
सिंह म्हणाले, आठवडे बाजारामध्ये ग्रामीण भागातून शहरी भागात येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे कोरोना संसर्ग ग्रामीण भागाकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी स्वच्छता, साफसफाईसह विशेष उपायोजना आखाव्यात. स्वच्छतागृहात हॅन्डवॉश उपलब्ध करुन देण्यात यावे. आठवडीबाजारामध्ये कोरोना संसर्गाबाबत जनजागृती करावी. यामध्ये दर्शनी भागात होर्डिग्ज लावणे, ऑडिओ संदेश, हॅन्डवॉश, सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत सूचित करावे. आठवडेबाजार झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वच्छता मोहिम त्वरीत राबवावी.
सहा वर्षीय रिपोर्टही निगेटिव्ह
सातारा : दुबई येथून प्रवास करुन आलेल्या सातारा जिल्ह्यातील सहा वर्षीय मुलीस अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तिला कोरडा खोकला असल्यामुळे तिच्या घशातील स्त्रावाचे नमुना एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आला होता. तिचा रिपोर्टही निगेटिव्ह आला असल्याने ती मुलगी कोरोना बाधित नसल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
ब्रेकिंग : जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या क्लबवर गुन्हा दाखल
जनतेनी कोरोनाच्या बाबतीत भीती न बाळगता दक्ष रहावे, तसेच जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.