Yashwantrao Chavan Sagareshwar Wildlife Sanctuary esakal
पश्चिम महाराष्ट्र

Wildlife Sanctuary : देशातलं पहिलं मानवनिर्मित अभयारण्य माहितीये? हरिण-काळविटांचं आहे 'माहेरघर'

यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य विभागास दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळते.

स्वप्नील पवार

‘सागरेश्वर’चे पर्यटनातील महत्त्व वाढण्यासाठी ही अत्यंत आनंददायी बातमी मानली जाते आहे. जिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगाव तालुक्याच्या सीमांवर ‘सागरेश्वर’ वसले आहे.

देवराष्ट्रे : देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य व हरणांचे (Deer) माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात (Yashwantrao Chavan Sagareshwar Wildlife Sanctuaries) महाराष्ट्रासह अन्य राज्यातूंन पर्यटक व शालेय सहली निसर्गसहली व हरणांचे दर्शन यामुळे मनमुराद आनंद घेण्यास दरवर्षी हमखास येत असतात.

श्रावण महिन्यातही लाखो पर्यटक येत असतात. यातून यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य विभागास दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळते. छोटे धबधबे (Waterfalls), प्राचीन हेमाडपंती मंदिर (Ancient Hemadpanti Temple), दक्षिण काशी श्री क्षेत्र सागरेश्वर देवस्थान नजीक असल्याने राज्यासह व परराज्यांतून अभयारण्य पाहण्यास पर्यटकांची गदीं होते. देशातील पहिले मानवनिर्मित यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यातील प्राण्यांची गणना करण्यात आली. त्यात मागील वर्षाच्या तुलनेत मोठ्या हरणांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

‘सागरेश्वर’चे पर्यटनातील महत्त्व वाढण्यासाठी ही अत्यंत आनंददायी बातमी मानली जाते आहे. जिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगाव तालुक्याच्या सीमांवर ‘सागरेश्वर’ वसले आहे. महाराष्ट्रातील लहान अभयारण्यांपैकी एक असलेल्या सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्रफळ १०.८७ चौरस किलोमीटर आहे. हे मानवनिर्मित अभयारण्य आहे. धों. म. मोहिते यांच्या ध्यासातून साकारलेलं आहे. डोंगररांगा, धुक्याची दाटी, गारवारा आणि हिरवागार परिसर मनाला प्रसन्न करून टाकतो.

माजी वनमंत्री दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांनी अभयारण्यासाठी भरघोस निधी देऊन कायापालट केला. वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी बांबू हट, निसर्ग माहिती केंद्र, ओपन अॅम्फी थिएटर, लहान मुलांसाठी बगीचा, छत्री बंगला, लिंगेश्वर मंदिर, गणपती मंदिर, डिअर पार्क, महान गुंड पॉइंट, फेटा उडवी पॉइंट, झेड रस्ता, बालोद्यान, पर्यटकांसाठी सफारी बसने अभयारण्याची सफारी करता येते. वन्यजीव आणि पशु-पक्ष्यांची माहिती देणारे फलक आपलं लक्ष वेधून घेतात. सागरेश्वर अभयारण्यात वन्यप्राण्यांना एक सुंदर अधिवास मिळाला आहे.

वर्षा पर्यटनासाठी अभयारण्य प्रशासन सज्ज आहे. पर्यटकांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.

- वैष्णवी झरे, वनक्षेत्रपाल, सागरेश्वर अभयारण्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT