पश्चिम महाराष्ट्र

'त्या' प्रकरणातून उदयनराजेंसह सर्वांची निर्दाेष मुक्तता

सिद्धार्थ लाटकर

सातारा : लोणंदस्थित (ता. खंडाळा) कंपनीच्या मालकाकडून खंडणी वसूल करणे, आणखी खंडणी देत नाही म्हणून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न या गुन्ह्यातून माजी खासदार उदयनराजे भाेसले यांच्यासह सर्व संशयितांची निर्दाेष मुक्तता झाली आहे. 

याप्रकरणी सन 2017 मध्ये शहर पोलिसांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल हाेता केला आहे. उदयनराजेंसमवेत अशोक कांतिलाल सावंत (वय 46, रा. यशवंतनगर, अकलूज), रणजित अमृत माने (वय 33, रा. साखरवाडी, फलटण), राजकुमार कृष्णात गायकवाड (वय 25, रा. होळ, ता. फलटण), सुकुमार सावता रासकर (वय 32, बाजारतळ, लोणंद), धनाजी नामदेव धायगुडे (वय 32, रा. पाडळी, खंडाळा), ज्ञानेश्‍वर दिलीप कांबळे (वय 29, रा. होळ), योगेश भुजंग बांदल (वय 30, रा. होळ), महेश अप्पा वाघुले (वय 25, रा. माळ आळी, लोणंद) व अविनाश दत्तात्रय सोनवले (वय 28, रा. कोळकी, फलटण) या संशयितांवर देखील गुन्हा दाखल झाला हाेता.

नक्की वाचा - आरोप करणाऱ्यांनी समोर येण्याची हिंमत ठेवावी - उदयनराजे

कंपनीत 1200 ते 1300 कामगार काम करतात. असे असताना कंपनी तीन महिने बंद होती. कंपनीत कामगार व व्यवस्थापनात संघर्ष सुरू आहे. कथित मारहाणीनंतर तक्रार दाखल होईपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. कामगारांचे पैसे द्या, असे उदयनराजे म्हणाले होते. त्याचा राग आल्याने खोटी तक्रार दिली आहे. राजकीय विरोधकांनी गैरफायदा घेऊन त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे, असा युक्तिवाद त्यावेळी उदयनराजेंकडून मांडण्यात आला हाेता. 
















त्यानंतर वेळाेवेळी न्यायालयीन कामकाज झाले. आज (साेमवार) जिल्हा न्यायालयात न्यायाधीश ए.ए.जे.खान यांनी उदयनराजेंसह सर्वांची निर्दाेष मुक्तता केली. बचाव पक्षातर्फे ऍड. धैर्यशील पाटील, ताहेर मणेर तसेच श्रीकांत शिवदे यांनी काम पाहिले. 



जरुर वाचा-  उदयनराजे सातारा पोलिस ठाण्यात झाले हजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मी रोहित शर्माच्या जागी असतो, तर पर्थ कसोटी खेळण्यासाठी पोहोचलो असतो', Sourav Ganguly च्या विधानाची चर्चा

Latest Maharashtra News Updates live : अमित शाह यांच्याऐवजी स्मृती इराणी आणि शिवराजसिंह चौहान यांच्या सभा

कऱ्हाड उत्तर-दक्षिण मतदारसंघांत आघाडी धर्म? पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील एकाच व्यासपीठावर; दोन्ही गटांनी घेतलं जुळवून!

Election Voting : मतदान कार्ड नाहीये? चिंता कशाला, या 12 पैकी कोणत्याही ओळखपत्रांद्वारे करा मतदान

विद्या नाही , माधुरी नाही तर 'ही' आहे खरी मंजुलिका ; बिहाइंड द सीन व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT