कोल्हापूर - नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनीने आज हॉस्टेलमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. शेफाली राजू पवार (वय 19, रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) असे तिचे नाव आहे. घटनास्थळी लक्ष्मीपुरी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. याबाबतची नोंद करण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरू होते.
याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती, शेफाली पवार ही सीपीआरमधील नर्सिंग महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावर एका खोलीत रूमपार्टनर बरोबर राहत होती.
आज सकाळी सव्वा तासच्या सुमारास हजेरी व त्यानंतर प्रार्थना सुरू झाली. पण ती प्रार्थनेला उपस्थित नसल्याने तिला शोधण्यासाठी तिच्या मैत्रिणी तिच्या खोलीत गेल्या. मात्र ती तेथे नव्हती. ती कपडे सुकविण्यासाठी असलेल्या शेजारील रिकाम्या खोलीत गेली असावी हे पाहण्यासाठी तिच्या मैत्रिणी तेथे गेल्या त्या रिकाम्या खोलीचा दरवाजा पुढे केला होता.
तो उघडून पाहिल्यानंतर त्यांना शेफाली पवार हिने लाकडी टेबलचा आधार घेत पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यांनी याची माहिती प्रशासनाला दिली. घटनास्थळी प्रशासनातील अधिकारी व डॉक्टरांनी धाव घेऊन तिला उपचारासाठी दाखल केले.
मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती मिळताच घटनास्थळी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांनी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा पंचनामा केला.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शेफालीची आई व शुभम व आयुष हे दोन लहान भाऊ सीपीआरध्ये दाखल झाले. त्यांनी मोठा आक्रोश केला. तिच्या आईने तिला घरी पूजा म्हणून बोलवले जात होते. ती सतत फोनवरून संपर्कात असायची.
काल सकाळीच तिचा फोन आला होता. ती नेहमी प्रमाणेच बोलली. असे तिने का पाऊल उचलले याचाच धक्का बसल्याचे सांगितले. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस. बी. शेळके करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.