crime esakal
पश्चिम महाराष्ट्र

Crime : बामणोलीत पैशांच्या वादातून पत्नीचा खून

पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून पतीने बांबूने केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

कुपवाड : पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून पतीने बांबूने केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला. बामणोली (ता. मिरज) येथील दत्तनगर परिसरात काल रात्री घटना घडली. याप्रकरणी पतीविरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमार भीमराव जाधव (वय ३८, रा. दत्तनगर बामणोली ता. मिरज) असे संशयितांचे नाव आहे, तर सुनंदा कुमार जाधव (३०, रा. दत्तनगर, बामणोली) असे मृत पत्नीचे नाव आहे. घटनेनंतर मृत पत्नीस शासकीय रुग्णालयात दाखल करून स्वतः पळ काढण्याच्या तयारीत असणाऱ्या संशयितास कुपवाड पोलिसांनी काही काळातच ताब्यात घेतले. याची फिर्याद सतीश मोहन जगदाळे (३०, रा. बसस्थानकाचा परिसर तावशी ता. पंढरपूर जि. सोलापूर) यांनी दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जाधव पती-पत्नी बामणोलीच्या दत्तनगर परिसरामध्ये कुटुंबासह राहत होते. संशयित पती कुमार हा हमाली करतो. काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घरामध्ये जेवण केल्यानंतर पती-पत्नीत वादावादी सुरू झाली. संशयित कुमार यास त्याच्या पत्नीच्या वडिलांनी काही पैसे मदत स्वरूपात दिले होते. पत्नी सुनंदाने ते पैसे परत मागितले.

‘तू तुझ्या वडिलांनी दिलेले पैसे मला परत का मागतेस.’ असा जाब कुमारने पत्नीला विचारला. तसेच ‘तू माहेरहून आणखी पैसे आण’ असे सांगितले. त्यानंतर सुनंदा हिस बांबूने मारहाण सुरू केली. घरगुती वादाचे रूपांतर भांडणात झाले. घरातील वस्तूंची तोडफोड करत संतापलेल्या संशयिताने पत्नीच्या शरीरावर, डोक्यावर बांबूच्या सहाय्याने अमानुष मरहाण केली. मारहाणीत पत्नी जमिनीवर निपचित कोसळली.

दरम्यान, संशयिताने जखमी अवस्थेतील पत्नीस सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी उपचारपूर्व केलेल्या तपासणीत महिलेस मृत घोषित केले. पत्नी मृत झाल्याचे समजतास संशयिताने रुग्णालयातून पोबारा केला. दरम्यान रात्री उशिरा प्रकाराची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. संशयिताचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांनी तपासाची चक्रे फिरविली.

ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांनी संशयितास अटक केली. पत्नीला मृत अवस्थेत रुग्णालयात दाखल करून तेथून स्वतः पळ काढण्याच्या तयारीत असणाऱ्या पतीने गुन्ह्याची कबुली देत सर्व हकीकत सांगितली. त्याच्यावर कुपवाडच्या औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला.

काळाच्या घाल्याने तिघींना पोरकेपण

घरात आई-वडिलांची भांडणे सुरू होती. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या तीन शालेय लहान मुली. तिन्ही पैकी दोघी मुली ‘दांडिया’ पाहण्यासाठी घराजवळच्या परिसरात गेल्या होत्या. तर मोठी मुलगी घरातच होती. हा गंभीर प्रकार तिच्या नजरेसमोर घडला. वडिलांच्या अमानुष मारहाणीत आईचा अकस्मात मृत्यू त्यानंतर खुनाच्या गुन्ह्यामध्ये वडिलांना पोलिसांकडून अटक. सणासुदीच्या दिवशीच काळाने घातलेला दुर्दैवी घाला ‘हुंदके’ गिळत ‘त्या’ तीनही लहानग्या मुली कश्याबश्या सोसत होत्या. घरगुती वादातून झालेल्या टोकाच्या भांडणात आई-वडिलांवाचून त्यांना पोरकेपण आले. ह्या घटनेची हळहळ परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT