crime file against lawyer islampur sangli 
पश्चिम महाराष्ट्र

सोशल मीडियावर अफवा पसरविल्याप्रकरणी वकीलावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर : सोशल मीडियावर व्हाट्सअप्प ग्रुपच्या माध्यमातून अफवा पसरवल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना जमीन मिळाला असतानाच आज इस्लामपूर पोलिसांनी आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती वकील आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात १४४ कलम लागू आहे. इस्लामपूर शहरात एकापाठोपाठ २५ रुग्ण आढळल्याने शहरातील वातावरण अत्यंत संवेदनशील बनल्याने पोलीस यंत्रणा सतर्क आहे. खोट्या अफवा, संशयास्पद मेसेज व्हायरस केल्याप्रकरणी नुकतीच चौघांवर कारवाई केली आहे. दरम्यान आज विशिष्ट समाजाविषयी द्वेष निर्माण करणे आणि शासनाने आवाहन करूनही तो न पाळल्याप्रकारणी सांगली येथील वकील आनंद देशपांडे यांच्याविरोधात आज इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

हवालदार संजय शांताराम पवार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वकील आनंद देशपांडे हे 'अड्व्होकेट इस्लामपूर' या व्हाट्सअप्प ग्रुपमध्ये आहेत. या ग्रुपवर त्यांनी २ एप्रिलला साडे चार वाजता एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यासोबत एका विशिष्ट समाजाचे नाव घेऊन म्हटले आहे की, अमुक या समाजाचा माणूस तुमच्या संपर्कात असेल तर त्याला जवळ येऊ देऊ नका. हे लोक कोरोना पसरवत आहेत. अशी अफवा पसरवणे व दोन समाजात तेढ निर्माण करणे याला जबाबदार धरून शासनाच्या आदेशाची अवज्ञा केली म्हणून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एस. एस. लवटे यांच्याकडे तपास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका ते शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का?

आजचे राशिभविष्य - 16 नोव्हेंबर 2024

Panchang 16 November: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे

Child Marriage: अल्पवयीन पत्नीसोबत लैंगिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

Mumbai Local Mega Block: रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या कसे असेल शेड्यूल

SCROLL FOR NEXT