crime news Case of Illegal Adoption of Girl Child Adopting a baby follow the law sangli  sakal
पश्चिम महाराष्ट्र

Adoption : बाळ दत्तक घेताय, पळवाटा नको, कायदा पाळा !

माहिती नसल्याने एजंटगिरी वाढली; बेकायदेशीर प्रक्रियेचा प्रयत्न, नियमांची पूर्तता केल्यास सुलभता

सकाळ वृत्तसेवा

सांगली : शहरात आठ महिन्यांच्या बालिकेचे अवैध दत्तक प्रकरण नुकतेच उघडकीस आले. या प्रकरणी दोन जोडप्यांसह एजंटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी कोल्हापूरसह राज्यात असे गुन्हे दाखल झाले आहेत. दत्तक प्रक्रिया क्लिष्ट आहे आणि बहुतेकांना त्याबाबतचे ज्ञान नाही. त्यामुळे एजंटांची मदत घेतली जाते. कायदेशीर पळवाटा शोधल्या जातात. त्यातून एजंटगिरी वाढली आणि बेकायदेशीर प्रक्रियेमुळे वाद निर्माण होत आहेत.

भारतात बाळ दत्तक घेण्याचे नियम निश्‍चित आणि कडक आहेत. नियमांची पूर्तता करूनच पात्र व्यक्तीला मूल दत्तक घेता येते. त्यासाठी इच्छुकांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. ही प्रक्रिया क्लिष्ट असली तरी समजून घेतल्यास सामान्य माणूसही ती पूर्ण करू शकतो. मानसतज्ज्ञ कालिदास पाटील यांनी त्याबाबत माहिती दिली.

‘कारा’ ऑनलाईन प्रणाली

मूल दत्तक घेण्यासाठी केंद्र सरकारने ‘केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण’ (CARA) स्थापन केले आहे. ही संस्था महिला-बाल विकास मंत्रालयांतर्गत नोडल संस्था आहे. ही प्रामुख्याने अनाथ, रस्त्यावर सोडून दिलेल्या आणि आत्मसमर्पण केलेल्या मुलांना दत्तक देण्याचे काम करते. २०१५ मध्ये भारतात मूल दत्तक प्रक्रियेचे नियम बदलले. दत्तक ही कायदेशीर प्रक्रिया मोठी आहे.

अविवाहित दत्तक घेऊ शकतात का?

विवाहित, घटस्फोटित, अविवाहित पुरुष या सर्वांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे. प्रत्येकासाठी काही खास मार्गदर्शक तत्त्वे आहेत. अविवाहित, घटस्फोटित आणि विवाहित असे कोणत्याही प्रकारचे जोडपे मूल दत्तक घेऊ शकते. अविवाहित पुरुष आणि महिलांसाठी काही अधिकचे नियम लागू आहेत. अविवाहित महिला मुलगी, मुलगा असे कोणतेही बाळ दत्तक घेऊ शकते. अविवाहित पुरुष एकच मुलगा दत्तक घेऊ शकतो.

मूल दत्तक घेण्यासाठी पात्रता

संभाव्य पालक शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे महत्त्वाचे आहे. संभाव्य पालकांना गंभीर आजार असू नये. लग्नाला दोन वर्षांहून अधिक काळ झाला असेल तर त्यासाठी पती-पत्नीची परस्परसंमती आवश्यक आहे. धर्माचे बंधन नाही. अनिवासी भारतीय, विदेशी लोकही पात्र ठरू शकतात.

सांगलीत १३ केंद्रे

जिल्ह्यात १३ बालसंगोपन केंद्रे आहेत. बालकल्याण समितीमार्फत देखभाल केली जाते. इथे येणारे बाळ एक तर पालकांनी संस्थेत आणून दिलेले असते अथवा बेवारस सापडलेले. ते बाळ कुठल्या बालसंगोपन केंद्रात दाखल केले जाईल, याचा अंतिम निर्णय बालकल्याण समिती घेते. दत्तक प्रक्रिया सुरू करून ते बाळ एका कुटुंबाचा भाग होईपर्यंत त्याची संपूर्ण काळजी घेतली जाते. पालकांनी बाळ स्वतः आणून दिलेले असेल तर त्यांना ६० दिवसांत बाळ परत नेण्याची संधी असते.

दृष्टिक्षेपात प्रक्रिया...

  • दत्तक प्रक्रियेसाठी बालकल्याण समितीकडे अर्ज करावा लागतो

  • त्यानंतर सामाजिक तपासणी अहवाल सादर होतो

  • बाह्य यंत्रणेमार्फत संभाव्य पालकांची माहिती घेतली जाते

  • त्यांचे समुपदेशनही केले जाते.

  • ‘कारा’ वेबसाईटवर हा सारा अहवाल सादर केला जातो

  • न्यायालयीन व्यवस्थेसमोर पुन्हा ‘इन-कॅमेरा’ सर्व प्रक्रिया होते

  • त्यानंतर दत्तक प्रक्रिया पूर्ण होते

  • बालकल्याण समिती आणि संस्थांमार्फत प्रतिमहिना तपासणी केली जाते

  • जिल्ह्यात दत्तक बाळांसाठी ‘वेटिंग’ असते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT