arrest sakal
पश्चिम महाराष्ट्र

विटंबना प्रकरण: बेळगावात 61 जणांविरुद्ध गुन्हे, 27 जणांना अटक

वाहनांची तोडफोड करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, भाषिक तेढ निर्माण करणे, कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणे, खुनाचा प्रयत्न करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलिसांनी संभाजी चौकातील आंदोलनकर्त्यांवर दाखल केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

वाहनांची तोडफोड करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, भाषिक तेढ निर्माण करणे, कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणे, खुनाचा प्रयत्न करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलिसांनी संभाजी चौकातील आंदोलनकर्त्यांवर दाखल केले आहेत.

बेळगाव - वाहनांची तोडफोड करणे, (Vehicle Damage) सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, (social property loss) भाषिक तेढ निर्माण करणे, कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणे, खुनाचा प्रयत्न करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे (Crime) पोलिसांनी संभाजी चौकातील आंदोलनकर्त्यांवर (Agitator) दाखल केले आहेत. खडेबाजार, मार्केट आणि कॅम्प या तीन पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ६१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी आज २७ जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील संशयितांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली.

श्रीराम सेना हिंदुस्थानाचे प्रमुख रमाकांत कोंडुसकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, नरेश निलजकर, मेघराज गुरव, विनायक सुतार, सुनील लोहार, नागेश काशीकर, रोहित माळवी, विनायक स. सुतार, गजानन जाधव, विनायक कोकितकर, दयानंद बडस्कर, सुरज गायकवाड, अंकुश केसरकर, राहुल भराते, महेश मुतगेकर, राहुल सावंत, सिद्धू उर्फ श्रीधर गेंजी, गणेश येळ्ळूरकर, विकी मंडोळकर, सुरज शिंदोळकर, भालचंद्र बडस्कर, विनायक धुळजी, राज गुरव, हरीश मुतगेकर, लोकनाथ रजपुत, भरत मेनसे अशी अटक करण्यात आलेल्याची नावे असून जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी १४ दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. तसेच प्रकाश शिरोळकर, मदण बामणे, अमर येळ्ळूरकर, श्रीकांत जाधव, बळवंत शिंदोळकर, मयूर बसरीकट्टी, शुभम सुतार, शुभम बांदिवडेकर, आकाश सुतार, रोहन पाटील, रिशिकेश बांदिवडेकर, विपुल चौगुले, सागर केरवाडकर, नागराज धामणे, आकाश पाटील, प्रदीप पाटील, श्री. केरवाडकर, सुरज पाटील, विनायक मुचंडी, रोहित भांदुर गल्ली, आदित्य धामणेकर, मयुर पाटील, यश मलिक, गजानन जाधव, राधे शहापूरकर, विनायक कोकितकर, सांबरा यांच्यावर देखील पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संभाजी चौकात शांततेत धरणे आंदोलन केल्यानंतर सर्वजण शांततेने घरी निघून गेले. मात्र काही वेळानंतर शहर परिसरात अधिवेशनानिमित्त दाखल झालेल्या पोलिस वाहन सरकारी वाहने व इतर खासगी वाहने अशी एकूण २० हून अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच जाळपोळ देखील करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दगडफेक व इतर सर्व गुन्हे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते व समिती कार्यकर्त्यांनी केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी सूड भावनेतून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. तसेच मध्यरात्रीपासूनच अनेकांच्या घरात घुसून धरपकड करण्यात आली. एकंदरीत कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.

जमावबंदीचा आदेश

बेळगावात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याने घटनेचे तीव्र पडसाद सीमाभागासह महाराष्ट्र व देशभरामध्ये उमटत आहेत. त्यातच काल रात्री बेळगावात दगडफेक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिस आयुक्तालयातर्फे शहर आणि तालुक्यात आज सकाळी ८ पासून उद्या सकाळी ६ पर्यंत कलम १४४ नुसार जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यानी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT