सोलापूर : सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरात अडकलेल्या नागरीकांना बाहेर काढण्यासाठी मदत करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील शंकर माने या मच्छिमाराच्या पत्नीची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर मंगळवारी (ता. ३१ डिसेंबर) संपली. शंकर माने यांच्या पत्नी सुशिला माने यांना शेतातून गवत आणत असताना सर्पदंश झाला होता. त्यांच्यावर अकलुज येथील एका रुग्णालयात १८ नोव्हेंबर २०१९ पासून उपचार सुरू होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांना उपचारासाठी मदत मिळावी म्हणून विविध संघटनांसह सांगलीकर सरसावले. मात्र, त्याला यश आले नाही.
हेही वाचा : ‘महाविकास’ला नडला फाजिल अत्मविश्वास
सांगलीत पुरग्रस्तांना मदत
सुशिला माने या करमाळा तालुक्यातील कंदर येथील आहेत. त्यांचे पती शंकर माने हे उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मच्छिमार करतात २०१९ मध्ये कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यात महापूराने हाहाकार घातला होता. त्यात मोठ्याप्रमाणात आर्थिक हानी झाली. जिवीतहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला होता. त्यात नागरिक अडकले होते. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत होते. तेव्हा मच्छिमारांना मदतीसाठी आवाहन केले होते. तत्कालीन तहसीलदार सुशिलकुमार बेल्हेकर यांनी करमाळा तालुक्यातील मच्छिमारांना मदतीसाठी जाण्यास सांगितले. त्यावर माणुसकीची भावना दाखवत कसलाही विचार न करता करमाळा तालुक्यातील मच्छिमार बोटी घेऊन सांगलीकडे रवाना झाले आहे. आणि जिवाचे रान करुन अनेक नागरिकांना त्यांनी सुखरुप बाहेर काढले. त्यात शंकर माने यांचाही सामावेश होता.
हेही वाचा : सोलापूर झेडपीत भाजपच्या पाठिंब्याने शिवसेनाचा अध्यक्ष (व्हिडिओ)
गवत आणताना सर्पदंश
शंकर माने यांचे मुळगाव माढा तालुक्यातील तांबवे (टें) आहे. पोटभरण्यासाठी कंदर येथील नदी किनाऱ्यावर आले. ते तिथेच अनेक दिवसांपासून स्थायीक झाले आहेत. त्यांना तेथे शेती नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडे शेळी व म्हैस आहे. सुशिला या त्यांच्यासाठीच दुसऱ्याच्या शेतात गवत आणण्यासाठी गेल्या होत्या. गवत घेऊन त्या घराकडे परतत असताना त्यांना सर्पदंश झाला होता. त्यावर उपचार करण्यासाठी अकलुज येथील रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. त्यांची हलाखीची परस्थिती असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यांना मदत मिळावी म्हणून पत्रकार आण्णा काळे व गणेश जगताप यांनी स्वत: काही संस्था व व्यक्तींना आवाहन केले होते. जगताप यांनी सरकारकडून मदत मिळावी म्हणून कागदपत्रे जमा केली. बेल्हेकर यांच्यासह अनेकांनी त्यांना मदत केली.
मच्छिमार माने यांच्या पत्नीवर उपचार करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून ‘सकाळ’नेही वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर सांगली येथील अनेक नागरिकांनी सामाजिक भान जपत मदतीसाठी हात पुढे केले. मात्र, त्याला मंगळवारी अपयश आले. १८ नोव्हेंबरपासून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या सुशिला माने यांचे मंगळवारी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री सहायता मदत निधीतून नाकरले
माने यांना मुख्यमंत्री वैद्यकीय साहायता निधीतून मदत मिळावी म्हणून प्रयत्न सुरु होते. मात्र, हा आजार त्यात बसत नसल्याचे सांगून कागदपत्रे स्विकारली नव्हती. दरम्यान जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या मार्फत शिफारस करुन पुन्हा प्रकरण दाखल करण्याचे प्रयत्न सुरु होते. सोलापूर ‘सकाळ’च्या वर्धापनदीनावेळी मच्छिमारांचा गौरव करण्यात आला होता. तेव्हा मच्छिमारांना मदत करण्याचे अश्वासन डॉ. भोसले यांनी दिले होते. त्यावर त्यांचे व मच्छिमार यांचे बोलणेही झाले होते. दोन दिवसात मदतीसाठी आवश्यक तो प्रस्ताव पाठवायचा होता. मात्र, त्यापूर्वीच सुशिला माने यांचे निधन झाले. माने यांना आणखीही मदतीची आवश्यकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.