Deepak Lele from Sangli traveled 8000 km from New York to Los Angeles in 1984 
पश्चिम महाराष्ट्र

नादच खुळा! 36 वर्षानंतरही सांगलीच्या पठ्ठ्याचा विक्रम जगात आजही कोणालाच मोडता आला नाही 

धोंडिराम पाटील

सांगली- कोरोना टाळेबंदीत लोकांना व्यायामाचं महत्व पटलं. बाहेर फिरायला बंदी, मात्र सायकलिंगला मुभा होती. त्यातून तंदुरुस्तीसाठी सायकलिंगचा ट्रेंड रुजला, वाढला. तो इतका, की सायकलींच्या छंदाने झपाटलेले शेकडो ग्रुप तयार झाले. सायकलींची विक्री वाढली. प्रतिक्षायादी तयार झाली. सांगली जिल्ह्याच्या सायकलपटूंनी देशांतर्गत मोहीम काढून सायकलिंग केलंच. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर आयर्नमॅन सारख्या स्पर्धेतही ठसा उमटवला आहे. यापुढे सायकलींग वाढण्यासाठी शहरांमध्ये स्वतंत्रपणे ट्रॅकची सायकलप्रेमींची अपेक्षा आहे. 
 
 सांगलीतील दीपक लेले यांनी  1984 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी न्यूयॉर्क ते लॉस एजिल्स असा 8 हजार किलिोमीटरचा प्रवास सर्कसीत असते तशा एकचाकी सायकलवरून पूर्ण केला. तर सांगली ते दिल्ली असा 1660 किलोमीटरचा प्रवास त्याच सायकलवरून 1982 मध्ये केला होता. हा विक्रम आज घडीलाही अबाधित आहे. आत्तापर्यंत असा विक्रम अजून कोणीही केलेला नाही. येथूनच सांगलीच्या सायकलींगच्या इतिहासाला उजाळा देता येईल. अलीकडच्या काही महिन्यात तर याच ट्रेंडमधून आयर्नमॅनसारख्या जगभर मान्यता असलेल्या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी काहीजण तयारी करीत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिक स्वप्निल कुंभारकर हे एकटेच फुल आयर्नमॅन झाले आहेत. मात्र किरण साहू यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने सहासात जण मान्यताप्राप्त हाफ आयर्नमॅन किताबाच्या स्पर्धेसाठी प्रयत्न करीत आहेत. खरं तर सांगलीला हौशी सायकलपटूंची मोठी परंपरा आहे.

किशोरवयीन गटापासून 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत अनेकांनी सायकलिंग करीत विविध मोहिमा पूर्ण केल्या आहेत. नेपाळमधील काठमांडू ते कन्याकुमारी, मुंबई ते कलकत्ता, ओरिसातील जगन्नाथपुरीपर्यंतच्या मोहिमांत सहभागी होऊन वेगळा ठसा उमटवला आहे. आजच्या काळात, अलीकडच्या काही दिवसात ऑनलाइन नोंदणी असलेल्या विविध स्पर्धात 50, 100, 200, 300, 500 किलोमीटर अंतराच्या स्पर्धा सांगलीकरांनी पूर्ण केल्या आहेत. सांगलीतील "सांगली सायकल स्नेही', कर्नाळमधील रोड स्पिन वॉरिअर्स अशा ग्रुप मोहिमा, स्पर्धांचे आयोजन करीत आहेत. त्यात राजस्थान, मध्यप्रदेश गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पॉंडिचेरी, हरियाणा, पंजाब अशा भारतीतील बहुतांक राज्यातील सायकलिस्ट भाग घेत आहेत. स्पर्धांचे वैशिष्ट्य म्हणजे नोंदणी ऑनलाइन करायची, प्रत्यक्ष स्पर्धेत भाग न घेता स्पर्धेचे निकष स्थानिक पातळीवर पूर्ण करायचे. त्याचे ऑनलाईन रेकॉर्ड विविध ऍपचा माध्यमातून आयोजक संस्थेकडे पाठवायचे. आयोजक संस्था कुरिअर, पोस्टाने स्पर्धेतील सहभागाबद्दल प्रशस्तीपत्र, स्पर्धेत क्रमांक मिळाला असेल तर त्याचे पदक, व सहभाग घेऊन स्पर्धा पूर्ण केली असल्यास प्रशस्तीपत्र पाठवून देतात. नंतर हे स्पर्धक विविध माध्यमांत लोकांपर्यंत पोहोचवतात. असे अनेक सायकलपटून तयार होत आहे, त्यात शिराळ्याचे शिंगटे बंधू, सांगलीवाडीचा दत्ता पाटील, माधवनगरचे ऐंशीपार गोविंदकाका परांजपे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त हुसेन कोरबू ही काही नावं अलीकडच्या काळात लोकांच्या तोंडी रुळली आहेत. 
त्याचबरोबर हाफ, फुल या किताबासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहेत. स्वप्नील कुंभारकर हे बांधकाम व्यावसायिक सन 2019 मध्ये जिल्ह्याचे पहिले आयर्नमॅन ठरले. सांगलीचे भूतपूर्व पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश हे तर या क्षेत्रात आयडॉल ठरले आहेत. आजही ते अनेक सांगलीकराच्या संपर्कात आहेत. सध्या किरण साहू यांच्या मार्गदर्शनाखाली अमित पेंडुरकर, डॉ. गणेश चौगुले. डॉ. शरद कुंभार, प्रीतम धामणे, प्रदीप सुतार, डॉ. श्रीनिकेतन काळे, डॉ. शिल्पा दाते हे हाफ आयर्नमॅन किताबाची तयारी करीत आहेत. 


 सायकलप्रेमींच्या अपेक्षा 
- सायकलींसाठी सांगली शहरात स्वतंत्र व सुरक्षित मार्गाची गरज 
- सायकलिंग व रनिंगचा समावेश असलेली ड्युएथलॉन अशी स्पर्धाची गरज 
- पुण्याप्रमाणे सायकल देखभालीसंदर्भात स्थानिक विक्रेत्यांकडून कार्यशाळांची अपेक्षा 
- डोंगरी भागातील सायकलिंग इव्हेंटसाठी सागरेश्वर,दंडोबा परिसरात सायकल ट्रॅकची अपेक्षा 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT