Demand for protection of Mokat animals in Khanapur 
पश्चिम महाराष्ट्र

खानापूरात मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी 

अनिलदत्त डोंगरे

खानापूर : शहरात मोकाट फिरणाऱ्या व शेतीचे मोठे नुकसान करणाऱ्या गायींच्या कळपाचा त्वरीत बंदोबस्त करावा, अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल, अशा आशयाचे निवेदन किसान सभेचे भाई अरुण माने व शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासो भगत यांनी नगराध्यक्ष तुषार मंडले यांना दिले आहे. 

खानापूर शहरात पन्नास ते साठ गाई, खोंड, बैलांचा कळप गेल्या सात आठ वर्षांपासून मोकाटपणे वावरत आहे. मोकाट जनावरे रस्त्यावर वावरत आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. मोकाट जनावरांचा मोठा फटका शेतीस बसत आहे. शहरालगत असलेल्या शेतीचे मोठे नुकसान मोकाट जनावरांमुळे होत आहे. हंगामी शेती बरोबर बागायती शेतीचे मोठे नुकसान जनावरांनी आतापर्यंत केले आहे. रात्रीच्या वेळी जनावरे पिकांचा फडशा पाडत आहेत. मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या भितीमुळे शेतकरी रात्री जागून काढत आहेत. जनावरांनी शहरालगतची शेती पूर्णपणे उध्वस्त केली आहे. 

जनावरांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. याबाबत नगरपंचायतीने तातडीने लक्ष घालून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. माकडांचे काही कळप खानापूर परिसरात वावरत आहेत. माकडांकडून ही शेतीचे मोठे नुकसान होत आहे. वन खात्याच्या मदतीने माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनात केली आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवड तसेच इतर शेती अनुदान मिळत नाही. यासाठी खानापूर नगरपंचायतीने पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांकडून निवेदनात केली आहे. मागण्या बाबत दि. 20 फेब्रुवारी पर्यंत उपाय योजना करावी. अन्यथा दि. 22 फेब्रुवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT