Sharad Pawar Sakal
पश्चिम महाराष्ट्र

मोहितेंच्या निर्णयाचा संदेश राज्यभर जाईल - शरद पवार

‘धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहिते-पाटील यांच्या निर्णयाचा संदेश हा एका मतदारसंघापुरता सीमित राहणार नाही, तर तो राज्यभरात जाईल.

सकाळ वृत्तसेवा

अकलूज : ‘‘धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहिते-पाटील यांच्या निर्णयाचा संदेश हा एका मतदारसंघापुरता सीमित राहणार नाही, तर तो राज्यभरात जाईल. त्यातून मागील लोकसभा निवडणुकीतील चित्र या वेळी बदलेले दिसेल,’’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज अकलूज येथे व्यक्त केला.

माढा, सोलापूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची रणनीती ठरविण्यासाठी शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पवार यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केले. या वेळी शेकापचे आमदार जयंत पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील आणि इतर नेते उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, ‘‘माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी लढावे, अशी आमची इच्छा होती. मोहिते-पाटील यांनी आमच्या पक्षात प्रवेश करण्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे लोकांचा आत्मविश्वास वाढवणारा संदेश राज्यात जाईल.

त्याचा उपयोग आम्हाला निश्तिच होईल आणि लोक आम्हाला स्वीकारतील. मागील निवडणुकीत आम्हाला अत्यंत कमी जागा मिळाल्या होत्या. ते चित्र या निवडणुकीत निश्चितपणे बदलेले दिसेल. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात आम्ही लोकांनी आणि आमच्या सहकाऱ्यांना आढावा घेतला.

या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वकाही करण्याची तयारी आमच्या सहकाऱ्यांनी ठेवली आहे. सोलापूर हा गांधी, नेहरूंचा विचार जपणारा जिल्हा आहे. त्यामुळे आमचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील.’’

आश्वासने पूर्ण न करणे भाजपचे वैशिष्ट्ये

भाजपवर टीका करताना शरद पवार म्हणाले,‘‘भाजपने आपल्या जाहीरनाम्यात जी आश्‍वासने दिली आहेत, त्यावर आताच भाष्य करणे योग्य होणार नाही. कारण, अनेक प्रश्‍नावर नुसतीच आश्वासने देणे आणि त्याची अंमलबजावणी न करणे हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे. भाजपने शेतीमालाच्या किमती, तरुणांच्या नोकऱ्या अशा अनेक प्रश्‍नांवर दिलेली आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी कायम राहणार का? जाणून घ्या आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Jammu Kashmir : ...तर काश्मीरमध्ये वेगळी स्थिती असती; उमर अब्दुल्लांकडून वाजपेयींची तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

SCROLL FOR NEXT