Due to heavy rains, the grapesyards abandoned the orchards; Powerless in the face of whimsical nature 
पश्चिम महाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे द्राक्षबागायतदारांनी बागा सोडल्या; लहरी निसर्गापुढे हतबल

बाळासाहेब गणे

तुंग (जि. सांगली ) : कोरोनामुळे सुरुवातीला द्राक्षमालाचे नुकसान झाले; त्यात आता पावसाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी सुरवातीला छाटणी घेतलेल्या बागांचे मोठे नुकसान झाले. या वर्षी छाटण्या उशिरा घेऊनही पावसाच्या तडाख्याने व प्रतिकूल हवामानने बागा रोगाला बळी पडल्या आहेत. महागडी औषध फवारणी करूनही पावसापुढे हतबल होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे याही वर्षी द्राक्ष बागायतदार आतबट्यात आले आहेत. बागा वाचवण्याची त्याची धडपड पावसापुढे फोल ठरली आहे. 

मागील आठवड्यापासून पहाटे धुके, दुपारपर्यंत ऊन-ढगाळ वातावरण व सायंकाळपासून पाऊस असे वातावरण होते. परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे द्राक्षबागांवर करपा, दावण्या, कुज व भुरी या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच प्रचंड पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले होते. त्यामुळे मुळांची वाढ थांबली होती. 

आगाप छाटणी झालेल्या बागा फ्लावरिंग स्टेजला आहेत. त्यामुळे घड तयार होतानाच दावण्याचा प्रादुर्भाव त्यावर होत आहे. घड कुजून जात आहेत. मागास छाटणी झालेल्या बागांमध्ये घड पोंगा व पहिल्या, दुस-या डिपिंगच्या अवस्थेत आसलेल्या बागेतील बुरशी व घडावर डाऊनीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच घड विरघळण्याचे प्रमाणही वाढले आहे. वांझ काढण्याच्या स्थीतीत असलेल्या बागांच्या काडीला बॅक्‍टेरिया करपा रोगाचा फटका बसत आहे. जास्त पाण्याने मुळांची कार्यक्षमता कमी होऊन झाडे अशक्त होणार आहेत. 

प्रादुर्भावावर उपायासाठी एसटीपीनेही फवारणी चालू असून, डस्टिंग मशीनव्दारे पावडरची फवारणी करून रोग नियंत्रणात आणण्याचा द्राक्षबागायतदार प्रयत्न करीत आहेत. द्रव औषधाच्या चौपट पावडरची फवारणी करुनही, त्याला अपेक्षित यश येताना दिसत नाही. मागास झालेल्या बागांमध्ये अपेक्षित उत्पादनाला फटका बसणार आहे. यामुळे काही शेतकरी बागा सोडण्याच्या मनसिकतेत आहेत. 

छाटणी लांबल्याने उत्पन्न घटणार
पावसाच्या उघडिपीनंतर रोग नियंत्रणात आणण्यासाठी औषध फवारणी करीत आहे. उशिरा छाटणी घेऊनही लहरी हवामानामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. उपाययोजना करुनही रोग नियंत्रणात येईना. छाटणी लांबल्याने उत्पन्न घटणार आहे. 
- शीतल पाटोळ, द्राक्ष उत्पादक, तुंग 

उत्पन्न मिळण्याची शक्‍यता नाही

अतिपावसाने द्राक्ष बागांचे नुकसान झाले. छाटणी, खरडणी पावसाने लांबल्यामुळे या वर्षी अपेक्षीत उत्पन्न मिळण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे बाग सोडली आहे. 
- आदिनाथ मिणच, द्राक्ष उत्पादक, तुंग 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT