effective implementation of Employment Guarantee Schemes for employment generation in rural  esakal
पश्चिम महाराष्ट्र

ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करण्यासाठी रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविणे गरजेचे: शासंन स्तराहून व्यापक प्रयत्नाची गरज

शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शासनाने रोजगार हमी योजना सबलीकरणासाठी व्यापक स्वरूपात प्रयत्न

शिवकुमार पाटील

किल्लेमच्छिंद्रगड : केंद्र शासनाने चालु वर्षी रोजगार हमी योजनेतून करण्यात येणाऱ्या कामासाठी दिल्या जाणाऱ्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. शाश्वत विकासाची उद्दिष्टे बहुतांशी रोजगार हमीशी निगडीत असल्याने रोहयो कमकुवत होणे ही बाब शाश्वत विकासाच्या भल्याची नाही.

शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शासनाने रोजगार हमी योजना सबलीकरणासाठी व्यापक स्वरूपात प्रयत्न करायला हवेत. योजनेत काही दोष असतील तर तेही आवश्कतेनुसार सुधारायलाही हवेत. तसे झाले तरच शाश्वत विकासाची धिम्या गतीने चाललेली गाडी रुळावर येण्याची शक्यता आहे. अन्यथा इतर अभियानाप्रमाणे शाश्वत विकासाचे अभियानही कमकुवत होवून दुर्लक्षिले जाण्याचा धोका आहे.

शासनाच्या ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, पशुसंवर्धन, शिक्षण, कृषी, आदिवासी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, ग्रामपंचायत प्रशासन, समाज कल्याण, आरोग्य, कौशल्य विकास या विभागाकडील १८३ योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी आवश्कतेनुसार मजुरीच्या कामासाठी रोजगार हमी योजनेशी सांगड घातल्यास शाश्वत विकासाची उद्दिष्टे साधण्यात अधिक गती येईल.

तथापी १८३ योजना मोठ्या प्रमाणात कागदावरच अस्तित्वात दिसत असल्याने त्या कार्यान्वीत होण्यासाठी शासनाने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, होत असलेले दुर्लक्ष टाळायला हवे. तरच शाश्वत विकासासाठी केलेले कृतीशील प्रयत्न यशस्वी होतील.

अलिकडे शहराबरोबर खेड्यातही वाढत्या लोकसंख्येमुळे शाश्वत विकासाच्या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण होत आहे. अशा परिस्थीतीत खेड्यातील लोकांना रोजगारासाठी शहराकडे करावी लागणारी भटकंती कमी करण्यासाठी ग्रामस्तरावर रोजगार निर्मितीच्या माध्यमातून शाश्वत विकास व्यापक प्रमाणात साधणे शक्य आहे.

त्यासाठी पर्यावरणपुरक कामांना गती देणे आणि भविष्यातील पिढ्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता वर्तमान गरजा पूर्ण करणारा शाश्वत विकास साधणे गरजेचे आहे.

त्याचाच भाग म्हणून पडीक जमिनी उपजावू होतील यासाठी प्रयत्न करणे, क्षारपड जमीन सुधारणा करून त्यांचा पोत सुधारणे, पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी व्यापक स्वरूपात वृक्षलागवड करणे, फळबाग लागवड करणे, गट शेतीबरोबर पशुपक्षी पालन व्यवसायास प्राधान्य देणे यासारखी कामे हाती घेण्यात आली तर शाश्वत विकासाचे स्वप्न साकारता येणे शक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT