Vasantdada Sugar Factory esakal
पश्चिम महाराष्ट्र

50 पतसंस्थांसह विकास सेवा सोसायट्यांच्या निवडणुकांचा उडणार धुरळा; वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीकडे लक्ष

विष्णू मोहिते

आचारसंहिता संपल्यामुळे रखडलेल्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्य शासनाच्या सहकार विभागाकडून त्यासाठी आदेशाची प्रतीक्षेत आहे.

सांगली : लोकसभा निवडणुकीची (Sangli Lok Sabha Elections) आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्यातील वसंतदादा साखर कारखाना (Vasantdada Sugar Factory), कोकळे येथील सहकारी साखर कारखाना(साईट-सोनी) या दोन कारखान्यांसह ‘ब’ वर्गातील हमाल पंचायत, निंबवडे सोसायटी आणि ‘क’ वर्गातील ४१ हून अधिक पतसंस्था आणि विकास सेवा सोसायट्यांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या संस्थांच्या निवडणुका काही दिवस पुढे ठकलण्यात आल्या होत्या. आचारसंहिता संपल्यामुळे आता या संस्थांच्या मतदार यादीपासून पुढील सर्व कार्यक्रम जाहीर होणार आहे.

पावसाळा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्यापूर्वी निवडणुका घेण्याचे सहकार विभागापुढे आव्हान असणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) सप्टेंबर २०२४ मध्ये निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी सहकारी साखर कारखाने आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका तातडीने जाहीर करण्याच्या हालचाली सुरू होणार आहेत. यामध्ये वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.

या कारखान्यांचे विद्यमान अध्यक्ष विशाल पाटील हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगलीतून निवडून आले असून त्यांच्याकडेच गेली काही वर्षे धुरा आहे. गेली सात वर्षे हा कारखाना श्री दत्त इंडिया कंपनीला चालवायला दिला आहे. उर्वरित तीन वर्षे करार शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे सध्याच्या होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे सभासद आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आचारसंहिता आज संपल्यामुळे रखडलेल्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्य शासनाच्या सहकार विभागाकडून त्यासाठी आदेशाची प्रतीक्षेत आहे. आचारसंहिता लागू असल्यामुळे जिल्ह्यातील दोन हजार सहकारी संस्थांना नफा वाटणी तसेच लाभांश वाटपही रखडलेले आहे. आचारसंहिता संपल्यानंतर कोणत्याही क्षणी नफा वाटप, लाभांश जाहीर करता येणार आहे.

नवीन संचालकांसाठी होणार चुरस...

निवडणुकीनंतर नवीन संचालकांना किमान दोन ते अडीच वर्षे थेट कारखान्याच्या कारभारात लक्ष घालता येणार आहे. वसंतदादा कारखान्याच्या दहा वर्षांच्या करारातील सात वर्षे पूर्ण झालेली आहेत. करार मुदत संपल्यानंतर पुन्हा त्यास मुदतवाढ दिली जाते की, पुन्हा संचालक मंडळ चालवणार हे महत्त्‍वाचे आहे. काही झाले तरी कागदावर अस्तित्वात असलेल्या कोकळे (सोनी) कारखाना आणि वसंतदादा कारखान्यांच्या निवडणुकीकडे लक्ष असणार आहे. वसंतदादा साखर कारखान्यात सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, जत, तासगाव, पलूस, कडेगाव तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद आहेत.

जिल्ह्यातील रखडलेल्या सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी सहकार विभागाकडून तातडीने आदेशाची अपेक्षा आहे. आदेश आल्यानंतर तातडीने निवडणुका जाहीर केल्या जातील. साखर कारखान्याची निवडणूक कोल्हापूर येथील सहकार आयुक्तांकडून जाहीर केली जाईल.

-मंगेश सुरवशे, जिल्हा सहकार उपनिबंधक, सांगली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT