Engineering Admission sakal
पश्चिम महाराष्ट्र

Engineering Admission : अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया रविवारपासून सुरू होण्याची शक्यता

बारावीचा निकाल लागून दीड महिना झाला, राज्य प्रवेशपूर्व सामायिक परीक्षा (सीईटी) विभागाने निकाल जाहीर करून २५ दिवस उलटले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवेखेड - बारावीचा निकाल लागून दीड महिना झाला, राज्य प्रवेशपूर्व सामायिक परीक्षा (सीईटी) विभागाने निकाल जाहीर करून २५ दिवस उलटले आहेत. अद्याप अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांची घालमेल वाढली आहे. प्रवेश प्रक्रिया रविवारपासून (ता. १४) होईल, असे संकेत आहेत राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयात सुमारे एक लाख ४५ हजार प्रवेश क्षमता आहे.

बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला. सीईटीचा निकाल लागून तब्बल २५ दिवस उलटले आहेत. सीईटीचा निकाल लागताच प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, अशी चर्चा होती. २४ जूनला ही प्रक्रिया सुरू होणार होती. पर्सेंटाईल आणि बारावीच्या गुणांमध्ये मोठा फरक असल्याचा विद्यार्थ्यांच्या तक्रारींमुळे सीईटी सेलला पुन्हा उत्तराची लिंक सुरु करावी लागली, त्यामुळेच ही प्रवेश प्रक्रिया रेंगाळल्याची चर्चा आहे. राज्यात बारावीनंतर व्यासायिक अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक अभियांत्रिकीला प्रवेश होतात.

रोजगाराच्या संधी असल्याने अभियांत्रिकीकडे पुन्हा कल वाढला आहे. ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया होते. सुरुवातीला नोंदणी, तर त्यानंतर कॉलेज आणि अभ्यासक्रम निवडण्याची प्रक्रिया होते. एकूण प्रवेशाच्या तीन फेऱ्या होतात. रिक्त जागा राहिल्यास एखादी फेरी होते. अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरू नसल्याने यंदाचे प्रथम वर्षाचे वर्ग उशिरा सुरू होतील, अशी चिन्हे आहेत.

प्रवेशासाठी चढाओढ...

यावर्षी सीईटीचे पर्सेंटाइल वाढल्याने प्रवेशासाठी चढाओढ होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रम आणि कॉलेज मिळवण्यासाठी कमालीची चुरस होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

SCROLL FOR NEXT