दूध संघ चालकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे.
ढालगांव : दूध संघचालकाकडून कवठेमंकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना (Farmers) दुधाचा (Milk) कमी दर व तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जादा दर दिला जात असल्याने कवठेमंकाळ तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
कवठेमंकाळ (Kavathe Mahankal), जत व आटपाडी तालुके नेहमी दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करून आपला घर खर्च चालवत आहेत. शेती ही निसर्गाच्या लहरीपणामुळे बेभरवशी झाली आहे.
आशाही परिस्थितीत शेतकरी चाऱ्याची पिके करून जर्सी गाय पालन करत आहेत. तर अनेक तरुण नोकरी मिळत नसल्याने दुग्ध व्यवसायात उतरले आहेत. मात्र, उत्पादित दुधाला म्हणावा तसा दर मिळत नसल्याने दूध धंदाच तोट्यात चालला आहे. खाद्याच्या वाढलेल्या भरमसाट दरामुळे शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे.
आशातच दूध संघ चालकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. तासगावसह बाकीच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना दुधाचा तीन ते चार रुपये जादा दर दिला जात आहे. तर कवठेमंकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दुधाचा तीन ते चार रुपये कमी दर देऊन शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात ५.३ फॅटला ३४ रुपये २० पैसे दर दिला जातो आहे तर तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ५.३ फॅटला ३८ रुपये ४० पैसे इतका दर दिला जात आहे. त्यामुळे कवठेमंकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना किमान चार रुपये दर कमी दिला जात असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले दूध व इतर ठिकाणी उत्पादन झालेले दूध काय वेगळ्या प्रकारचे आहे का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
आमचा सर्व तालुक्यांत दुधाचा एकच दर आहे. कमी जास्त देण्याचा प्रश्नच नाही.
-सूरज शिरबाळकर, चितळे दूध संघ
शेतकऱ्यांना कोणी वाली नाही, खाद्याच्या दरवाढीने मेळ बसत नाही.आशातच संघचालक शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत.
-शहाजी झुरे, दूध उत्पादक शेतकरी, ढालगांव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.