कऱ्हाड : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. 21 जागांसाठी 165 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी 21 अर्जच शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली. त्याबद्दल सहकारमंत्री पाटील यांनी अर्ज मागे घेवुन कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली त्या इच्छुकांचे व सभासदांचे पत्रकार परिषदेत आभार मानले.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणुक जाहीर झाली होती. त्यासाठी कऱ्हाड, तळबीड, उंब्रज, कोपर्डे हवेली, मसूर, वाठार किरोली या गटांसह अन्य प्रवर्गातुन 145 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दाखल केलेल्या उमदेवारी अर्ज माघारीचा आजचा (मंगळवार) शेवटचा दिवस होता.
हेही वाचा - महाराष्ट्रात सातारचे हे पत्र हाेतेय व्हायरल
त्यामुळे आज सकाळ पासूनच सहकारमंत्री पाटील यांच्या निवासस्थानी इच्छुकांनी गर्दी केली होती. काही गटातील इच्छुकांनी पाटील यांना तुम्ही निर्णय घ्या, असे सुचवले तर काही ठिकाणी पाटील यांना मध्यस्थी करावी लागली. सहकारमंत्री पाटील यांच्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद दिल्याने 21 उमेदवारांसह अन्य इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
सहकारमंत्री पाटील म्हणाले, जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांच्या विचाराने निवडणूक बिनविरोध झाली. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी माझ्यावर सहकार खात्याची राज्याची जबाबदारी दिली आहे. त्यानंतर काही दिवसातच कारखान्याची निवडणूक लागली. त्यामुळे मला जास्त वेळ देता आला नाही. मात्र सह्याद्रीच्या सभासदांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याने आणि इच्छुकांनी काही ठिकाणी आपसात समजुत करुन आणि काही ठिकाणी मी निर्णय घेतल्याने ही निवडणुक बिनविरोध झाली. त्यातुन कारखान्याचे 42 लाख रुपये वाचले आहेत.
सहकारी साखर कारखानदारी अडचणीत असतानाही सह्याद्री कारखान्याने जादा दर दिला आहे. मात्र सभासदांच्या ऊसाचे गाळप होण्यासाठी विस्तारवाढ करणे आवश्यक आहे. नवीन संचालक मंडळाचा कारखान्याची विस्तारवाढ आणि अपुऱ्या सिंचन योजना पुर्ण करणे हे ध्येय असेल. निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचेही सहकार्य राहिले. पालिकेच्या निवडणुकीतही ही आघाडी राहिल असेही ते यावेळी म्हणाले.
बिनविरोध झालेले संचालक असे
सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत बिनविरोध झालेल्यामध्ये सहकारमंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील, जशराज पाटील (कऱ्हाड), रामचंद्र पाटील (तांबवे), माणिकराव पाटील (घोणशी), सुरेश माने (चरेगाव), बजरंग पवार (बेलवडे हवेली), सर्जेराव खंडाईत (पाल), दत्तात्रय जाधव ( उंब्रज), रामदास पवार (विरवडे), शंकर चव्हाण (कोपर्डे हवेली), मानसिंगराव जगदाळे (मसुर), संतोष घार्गे (वडगाव-जयरामस्वामी), लालासाहेब पाटील (कवठे), कांतीलाल भोसले (तारगाव), वसंत कणसे (पिंपरी), अविनाश माने (रहिमतपूर), शारदा पाटील (नडशी), लक्ष्मी गायकवाड (वाठार किरोली), जयवंत थोरात (हिंगनोळे), लहु जाधव (मसुर) व संजय कुंभार (नांदगाव-सातारा) यांचा समावेश आहे.
नक्की वाचा - शेतकरी कुटुंबातील किरणचा अचूक वेध;नेमबाजीत विश्वविक्रमापेक्षा सरस कामगिरी
एक फेब्रुवारीपासुन शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्ज जमा होणार
महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेची रक्कम लिंकींगच्या माध्यमातुन एक फेब्रुवारीपासुन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास प्रारंभ होईल. दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. त्याचबरोबर नियमीत शेतकऱ्यांसाठीही लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
सह्याद्री कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, शेतकऱ्यांना कोणताही त्रास न होता कर्जमाफीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा व्हावे यासाठी सरकारने महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने कर्जमाफीची योजना जाहीर केली आहे. त्या योजनेची रक्कम लिंकींगच्या माध्यमातुन एक फेब्रुवारीपासुन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास प्रारंभ होईल. त्याचबरोबर जे नियमीत कर्जदार आहेत त्यांच्यासाठीही शासनाने निर्णय घ्यायचा ठरवले आहे. त्यासाठी मंत्र्यांच्या उपसमिती नेमली आहे.
हेही वाचा त्या प्रकरणातून उदयनराजेंसह सर्वांची निर्दाेष मुक्तता
त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मी, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, मंत्री एकनाथ शिंदे, दादाजी भुसे अशा आमच्या सहा मत्र्यांचा समावेश आहे. त्या समितीची पहिली बैठक झाली आहे. लवकरच नियमीत कर्जफेड करणाऱ्यांनाही न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. दरम्यान या कर्जमाफीच्या योजनेत सहकारी बॅंकाची यंत्रणा गुंतल्यामुळे जिल्हा बॅंका आणि सहकारी सोसायट्या यांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.