Bogus Fertilizers Pesticides 
पश्चिम महाराष्ट्र

Fertilizer Rate : जागतिक बाजारात रासायनिक खत दरात घसरण

भारतात मात्र ‘जैसे थे’ स्थिती ; प्रती बॅग १५०-३०० रुपये कपात अपेक्षित

सकाळ वृत्तसेवा

सांगली : चार-पाच महिन्यांपासून जागतिक पातळीवर रासायनिक खतांच्या दरात घसरण सुरू आहे. फेब्रुवारीमध्ये डीएपीचे दर ६८ हजार ८१२ रुपये प्रतिटन होते. सध्या ४५ हजार ३०१ रुपये प्रतिटनवर आहेत. युरियाचे दर २६ हजार ६२४ रुपये प्रतिटनावरून २५ हजार ८०४ रुपये प्रतिटन झाला आहे. देशात रासायनिक खतांच्या किमती सन २०२१-२२ च्याच कायम आहेत. खतांचे दर प्रतिबॅग किमान १५० ते ३०० रुपयांनी कमी होणे अपेक्षित आहे.

एमओपीचे दर प्रतिटन ४८ हजार ३३२ रुपयांवरून ३४ हजार ५७० रुपयांवर आले आहेत. भारतात दरवर्षी किमान १०० लाख टन डीएपीचा वापर केला जात असून, ६० लाख टन डीएपी आयात केले जाते. युरियाचा वापर किमान १०० लाख टन आहे. एमओपीचा वापर २६ लाख टन असून, २५ लाख टन एमओपी आयात केले जाते. एनपीके मिश्र खतांचा वापर ११५ लाख टन असता तरी १२ ते १४ लाख टन मिश्र खते आयात केली जातात.

युरियाच्या उत्पादनात अमोनिया वायूचा वापर केला जातो. पूर्वी अमोनियाचे दर ९८ हजार ३०४ रुपये प्रतिटन होता. आता दर कमी झाला आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात अमोनिया वायूचे दर ३० हजार ७२० रुपये प्रतिटन झाले आहेत. डीएपीच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या फॉस्फरिक ॲसिडचे दर प्रतिटन १ लाख २० हजार ८१७ रुपयांवरून ८६ हजार १६ रुपयांवर आले आहेत. परिणामी, जागतिक बाजारात रासायनिक खते आणि ती तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचे दर कमी होत असल्याने भारतात सर्वच रासायनिक खतांचे दर कमी व्हायला हवे, असे मत व्यक्त होत आहे.

रासायनिक खतांचे सध्याचे दर (रुपये-प्रतिबॅग)

  • डीएपी १,३५०

  • एसएसपी ५५०

  • युरिया २६६

मिश्र खते-

  • १०:२६:२६ - १,४७०

  • २०:२०:००:१३ - १,२५०

  • १५:१५:१५ - १,४७०

गेल्या चार वर्षांपासून शेती व शेतकरी हैराण झाले आहेत. सध्या रासायनिक खतांच्या कच्च्या मालाचे दर कमी होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने खतांचे दर कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. यासाठी संघटनेकडून मागणीचा रेटा सुरु ठेवला जाणार आहे. खतांचा पुरवठाही सुरळी ठेवला पाहिजे.

- अविनाश पाटील, अध्यक्ष, ॲग्रो इनपुस्टस संघटना, सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT